शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या अधिकाराचाही अभ्यास होणे अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 01:35 IST

 नगरसेवकांनी कायद्यातील त्रुटी अभ्यासपूर्वक दूर करत आपले कौशल्य पणाला लावावे.  प्रभागाचे कामकाज करताना नगरसेवकांना असलेले अधिकार समजण्यासाठी सक्षम भूमिका मांडण्याची गरज आहे. कौशल्यपूर्वक अभ्यासातून  आपल्या प्रभागाचा विकास प्रामाणिकपणे साधल्यास विकास कामांना कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रतिपादन नगरसेवक परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गुजर पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकिरण गुजर : मुंबई नगरसेवक परिषदेचा नाशिक विभागीय मेळावा

सातपूर :  नगरसेवकांनी कायद्यातील त्रुटी अभ्यासपूर्वक दूर करत आपले कौशल्य पणाला लावावे.  प्रभागाचे कामकाज करताना नगरसेवकांना असलेले अधिकार समजण्यासाठी सक्षम भूमिका मांडण्याची गरज आहे. कौशल्यपूर्वक अभ्यासातून  आपल्या प्रभागाचा विकास प्रामाणिकपणे साधल्यास विकास कामांना कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रतिपादन नगरसेवक परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गुजर पाटील यांनी केले.  मुंबई नगरसेवक परिषदेचा नाशिक विभागीय मेळावा रविवारी (दि.१७) सातपूर येथे पार पडला. यावेळी अध्यक्षपदावरुन गुजर बोलत होते. व्यासपीठावर परिषदेचे कार्याध्यक्ष संजू वाडे, राज्य कमिटी सदस्य अभय शेळके, प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटील, राज्य उपाध्यक्ष व आयोजक दिनकर पाटील, जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड, नाशिक सरचिटणीस सलीम शेख, पुरुषोत्तम लोहगावकर, भूषण कासलीवाल, महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा आव्हाड, अपर्णा धात्रक आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन  करण्यात आले.        प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी परिषदेचे ध्येयधोरणे कार्यपद्धती समजावून सांगितली. वकील, डॉक्टर, आयपीएस, आयएएस अधिकारी यांच्या संघटना ज्याप्रकारे काम करतात त्याच धर्तीवर परिषदेचे कामकाज चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार, खासदारांना पेन्शन लागू होऊ शकते तर नगरसेवकांना का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांच्या मानधनात वाढ करून पेन्शन योजना लागू करण्यासाठी परिषदेने काम करावे, अशी मागणी परिषदेचे सरचिटणीस तथा नगरसेवक सलीम शेख यांनी यावेळी केली. जात, धर्म, पक्षविरहित संघटना स्थापन करीत राज्यातील नगरसेवकांना एकत्र आणण्याचे काम परिषद करीत आहे. नगरसेवकांच्या न्याय्य हक्कासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी संघटना मोठी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी पक्षभेद बाजूला सारत एकत्र येण्याचे आवाहन राज्य उपाध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. यावेळी नाशिकसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण