शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा-टॅक्सीचालक, परवान्याचा तपशील देणे ठरणार बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:11 IST

आॅटो रिक्षा तसेच टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या माहितीसाठी तसेच गैरप्रकारांवर आळा बसावा, यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी केलेल्या ठरावानुसार नाशिक जिल्ह्यातील आॅटो रिक्षा तसेच टॅक्सी परवानाधारकाचा परवाना आणि वाहन चालकाचा तपशील प्रवाशांना माहितीसाठी व सहज दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे.

पंचवटी : आॅटो रिक्षा तसेच टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या माहितीसाठी तसेच गैरप्रकारांवर आळा बसावा, यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी केलेल्या ठरावानुसार नाशिक जिल्ह्यातील आॅटो रिक्षा तसेच टॅक्सी परवानाधारकाचा परवाना आणि वाहन चालकाचा तपशील प्रवाशांना माहितीसाठी व सहज दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे.यासाठी श्रद्धा आर्ट यांची नेमणूक करण्यात आली असून, स्टिकर देणार आहे. त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ज्या परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांनी अद्यापपर्यंत स्टिकर्स घेतले नाही त्यांनी येत्या ३० मे पर्यंत स्टिकर्स घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जे परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालक स्टिकर्स घेणार नाहीत त्यांच्यावर येत्या १ जूनपासून कलम ८६ /१७७ नुसार कारवाई केली जाणार आहे.नोंदणी झालेल्या दिनांकापासून २० वर्ष पूर्ण झालेल्या आॅटो रिक्षा व टॅक्सीचालक परवानाधारकांनी त्यांच्या वाहनाची नोंदणी तत्काळ रद्द करून घ्यावी. ज्या वाहनधारकांनी वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतरही वाहन स्क्र ॅप केलेले नाही, त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस यांच्यामार्फत १ एप्रिलपासून संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आलेल्या ठरावानुसार जिल्ह्यातील आॅटो रिक्षा व टॅक्सी यांचे वयोमान नोंदणी केलेल्या तारखेपासून २० वर्ष इतके मर्यादित करण्यात आले आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिक