शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षावाल्या काकांकडून मुलांना पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:04 IST

नाशिकरोड : वर्षभर शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षा-व्हॅनचालक काकांशी बच्चेकंपनी व विद्यार्थ्यांची वेगळी नाळ जुळलेली असते. परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर रिक्षा, व्हॅनचालक काका बच्चेकंपनीला ठिकठिकाणी पार्टी देताना दिसत आहे.

ठळक मुद्देमुलांची धमाल : बच्चेकंपनीला उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद

सुट्टी लागल्याने वर्षभर विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षा-व्हॅनचालक काकांकडून देण्यात आलेल्या पार्टीत सहभागी झालेले बच्चेकंपनी.

 

 

नाशिकरोड : वर्षभर शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षा-व्हॅनचालक काकांशी बच्चेकंपनी व विद्यार्थ्यांची वेगळी नाळ जुळलेली असते. परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर रिक्षा, व्हॅनचालक काका बच्चेकंपनीला ठिकठिकाणी पार्टी देताना दिसत आहे.खासगी इंग्रजी शाळा, इंटरनॅशनल स्कूल यांच्या शाळांच्या वेळा पूर्वीच्या शाळांच्या वेळेपेक्षा वेगळ्या आहेत. शाळा, शिकवणी, विशेष क्लासेस, स्पोर्ट्स व घरचा अभ्यास यामुळे बच्चेकंपनीपासून मोठ्या विद्यार्थ्यांचे शालेय जीवन अत्यंत व्यस्त झाले आहे. तसेच शिक्षणाला आलेले महत्त्व, शाळांचे वाढलेले प्रस्थ यामुळे पालकवर्ग आपल्या पाल्याला लांब अंतरावरील शाळेत टाकण्यास कचरत नाही. वेगवान जीवन शैलीमुळे पाल्याला शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी काळाच्या ओघात रिक्षा-व्हॅनचालक काकांकडे गेली आहे. बच्चे कंपनी, विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ने-आण करणाºया रिक्षा-व्हॅनचालक काकांचे एक स्रेहाचे नाते निर्माणझाले आहे.वर्षभर विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ने-आण करणाºया रिक्षा-व्हॅनचालक काका देखील परीक्षा संपल्यानंतर महिना-दीड महिना उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेणार आहे. परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्याने विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागत आहे. त्यामुळे परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्यानंतर वर्षभर विद्यार्थ्यांची ने-आण करणाºया रिक्षा-व्हॅनचालक काकांकडून बच्चे कंपनी विद्यार्थ्यांना उद्यान, समाजमंदिर, ओळखीची मोकळी जागा आदि ठिकाणी छोटी पार्टी दिली जात आहे. परीक्षा संपुन सुट्टी लागल्याने काही दिवसांकरिता अभ्यासाचा ताण मिटल्याने बच्चेकंपनी मोठ्या आनंदात आहे.आवडीचे नियोजन परीक्षा संपल्यानंतर पार्टी देताना काकांकडून बच्चेकंपनीच्या आवडीचे नियोजन केले जात आहे. पावभाजी, पाववडा, भजी, बटाटावडा, भेळभत्ता, वेफर्स, बर्फी, सरबत, उसाचा रस, आइस्क्रीम, बर्फाचा गोळा आदी खाद्यपदार्थांची पार्टी दिली जात आहे. त्याबरोबर चॉकलेट, कॅटबरी, फुगेदेखील दिले जात असून सुट्टीनंतर परत घ्यायला येतो, असे म्हणत काका विद्यार्थ्यांचा निरोप घेत-देत आहे.