शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भेळविक्रेत्याची हत्त्या करणार्‍या टोळीमधील दीड वर्षांपासून फरार असलेल्या सराईत किरणच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:45 IST

नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवरील मखमलाबाद रस्त्यावर भेळभत्ता विक्रीचा व्यवसाय करणार्‍या वाघ बंधूंवर सराईत गुन्हेगारांच्या टोळीने हल्ला करुन दीड वर्षांपुर्वी सुनील वाघ यास ठार मारले होते व हेमंत वाघ हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले. या हल्ल्यातील फरार संशयित सराईत गुंड किरण नागरेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना रविवारी रात्री यश आले.दीड वर्षांपुर्वी हनुमानवाडी ...

ठळक मुद्देकुविख्यात आरोपी कुंदन सुरेश परदेशी, राकेश कोष्टी, जया दिवे, व्यंक्या मोरे, अक्षय इंगळे, अजय बागुल व अन्य आरोपींना अटक केली होती. यामधील नागरे हा फरार होता. पंचवटी पोलिसांनी मखमलाबाद शिवारातून अटक केली.नागरे हा गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. पोलिसांनी परिसरात सापळा रचला व कोणतीही चूक न करता नागरेला रविवारी रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेतले.

नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवरील मखमलाबाद रस्त्यावर भेळभत्ता विक्रीचा व्यवसाय करणार्‍या वाघ बंधूंवर सराईत गुन्हेगारांच्या टोळीने हल्ला करुन दीड वर्षांपुर्वी सुनील वाघ यास ठार मारले होते व हेमंत वाघ हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले. या हल्ल्यातील फरार संशयित सराईत गुंड किरण नागरेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना रविवारी रात्री यश आले.दीड वर्षांपुर्वी हनुमानवाडी कॉर्नर येथे दोघा भावंडांवर प्राणघातक हल्ला करून सुनील याच्या खूनात फरार असलेला जाणता राजा कॉलनीतील सराईत गुन्हेगार किरण दिनेश नागरे (३५ ) याला पंचवटी पोलिसांनी मखमलाबाद शिवारातून अटक केली.नागरे हा गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. पंचवटी पोलीस व गुन्हे शोध पथक नागरेच्या मागावर होते; मात्र नागरे पळून जाण्यास यशस्वी होत होता. गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी पोलिसांनी मखमलाबाद शिवारात सापळा रचला. नागरे यासा शिताफीने अटक करत बेड्या ठोकल्या. या प्राणघातक हल्ल्यात व खूनामध्ये कुविख्यात आरोपी कुंदन सुरेश परदेशी, राकेश कोष्टी, जया दिवे, व्यंक्या मोरे, अक्षय इंगळे, अजय बागुल व अन्य आरोपींना अटक केली होती. यामधील नागरे हा फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते. यामध्ये काही आरोपींवर मोक्कान्वये कारवाईदेखील करण्यात आली आहे. टोळी यूध्दातून हा गुन्हा घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वाघ खून प्रकरणातील फरार संशियत नागरे हा मखमलाबाद शिवारात येणार असल्याची खात्रीशिर गुप्त माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळाली त्यानंतर तत्काळ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, हवलदार सचिन म्हस्दे, सतीश वसावे, जितू जाधव, दशरथ निंबाळकर आदिंचे पथक मखमलाबाद शिवारात पाठविण्यात आले. पोलिसांनी परिसरात सापळा रचला व कोणतीही चूक न करता नागरेला रविवारी रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेतले.