दत्तमंदिर सिग्नलजवळील रामनगर येथील प्रवीण धर्माजी खरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे मेव्हणे केदार मधुकर शेजवळ (४४, रा. रामनगर) हे गेल्या शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या रिक्षामध्ये (एमएच१५ एसयु ५८०४) नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन दत्तमंदिर सिग्नलकडून व्दारकेच्या दिशेने जात होते. श्री घंटी म्हसोबा मंदिराजवळ रिक्षाच्या बाजूने वेगात गेलेल्या पिकअप गाडीने रिक्षाला हुलकावणी दिल्याने रिक्षा रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. चालक केदार शेजवळ व एक प्रवासी यामध्ये गंभीर जखमी झाले. प्रवीण खरे यांनी नागरिकांच्या मदतीने दोघांना बिटको रुग्णालयात दाखल केले. शेजवळ यांना गंभीर मार लागल्याने उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झाडावर रिक्षा आदळून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST