शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

अवकाळी पावसामुळे भात उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST

नांदूरवैद्य : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात पावसाने तोंडाशी ...

नांदूरवैद्य : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात पावसाने तोंडाशी आलेले पीक जमिनदोस्त केल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया गेला असून आणि त्यातच करपा, तुडतुड्या या रोगाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इगतपुरी तालुक्यात जवळपास तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. यावर्षी सुरुवातीला पावसाने सुरुवात चांगली केली असली तरी शेतकऱ्यांनी पीक विमे भरले असताना शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत. भातालाही कवडीमोल भाव असल्यामुळे दिवाळीतदेखील शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. भात पिकाचे करपा व तुडतुड्या या रोगाने नुकसान केले आहे. इगतपुरी तालुका कृषी विभागाच्यावतीने रोग गेलेल्या भात पिकावर पंचनामे करण्याचे सौजन्यदेखील दाखवले नाही. अशा अक्षम्य कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी यांची तालुक्यातून बदली करण्याची मागणी शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ यांनी केली आहे.

----------------------

गत काही वर्षात वाढलेली महागाई शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात भक्कम वाढ करणारी ठरलेली असताना भातास मिळणारा बाजारभाव शेतकऱ्यास कर्जबाजारी करत आहे. खडीबरड एकर दीड एकर जमीन असलेला अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी भातशेती करण्यापेक्षा ती शेतजमीन विकून पोट भरण्याच्या मार्गाला लागलेला दिसून येत आहे. आजच्या दिवसात भातशेतीस लागवडीसह एकरी खर्च २० हजाराच्या पुढे गेला आहे तर मिळणारे उत्पन्न दहा ते पंधरा हजाराची मर्यादा ओलांडत नाही. सरासरी एकरी उत्पन्न १० क्विंटल आहे. किमान भाव २००० रुपये मिळाल्यास एकूण उत्पन्न २०००० रुपये व खर्च २५००० असा तोट्याचा धंदा झाला आहे.

--------------------

भात पिकास येणारा खर्च याप्रमाणे आहे

बियाणे - २००० रुपये

मशागत - ३००० रुपये

खते - ५०० ते २००० रुपये

लावणीची मजुरी - १०००० रुपये

निंदण मजुरी - ३००० रुपये

सोंगणी व इतर - ५००० रुपये

. -----------------------------

एकूण २५००० रुपये आणि एकरी उत्पन्न २० हजार.

---------------------

यावर्षी सर्वदूर अवकाळी पावसाने व रोगाने भात शेती अगदी भुईसपाट केली आहे. पावसाचा हंगाम होऊन गेल्यानंतरही ही पिके शेतात पडून होती. एकीकडे पाऊस सुरू आणि खाली बळीराजा भात झोडण्याचे चित्र तालुक्यात दिसत होते. इगतपुरी कृषी विभागाकडून पंचनामे कधी झाले, तेच समजलं नाही. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या व रोगाच्या कचाट्यातून वाचलेली भात पिके वाचवली असताना इगतपुरी कृषी विभागाने पंचनामे केले नाही.

- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी संघटना.

(१६ नांदूरवैद्य१)

===Photopath===

161220\16nsk_2_16122020_13.jpg

===Caption===

(१६ नांदूरवैद्य१)