शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरुपी अधिका-यांसाठी क्रांती दलाचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:25 IST

सटाणा : रिक्त पदांवर नेमणुकांची मागणी

ठळक मुद्दे तालुका कृषी अधिकारी ,पशुधन विकास अधिकारी ,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आदी प्रमुख पदे रिक्त आहेत

सटाणा : शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यास टाळाटाळ करणा-या बागलाणच्या प्रभारी गटविकास अधिका-यांसह विविध खात्यांचा प्रभारी पदभार काढून कायमस्वरूपी अधिका-यांची नेमणूक करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरकर, तालुकाध्यक्ष लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.२)पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.जितेंद्र देवरे गेल्या आठ महिन्यांपासून रजेवर गेल्यामुळे देवळ्याचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे बागलाणच्या गटविकास अधिका-यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. मात्र पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिल्यापासून अनेक योजना रखडल्या असल्याचे महाराणा प्रताप क्रांती दलाच्या पदाधिका-यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी ,पशुधन विकास अधिकारी ,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आदी प्रमुख पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातून समस्या घेऊन येणा-या ग्रामस्थांना तसेच सरपंच ,अन्य पदाधिका-यांना अक्षरश: हेलपाटे मारावे लागतात. पाटील यांच्याविषयी वाढत्या तक्ररींमुळे अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरकर, तालुकाध्यक्ष लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली सदर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा सहसंघटक नथू ठोके ,उपाध्यक्ष जयेश जाधव, संजय पवार, समाधान अहिरे ,युवराज निकम,दीपक ठोके आदी सहभागी झाले आहेत.अनेक योजना रखडल्यारिक्त जागांवर असलेल्या प्रभारी अधिका-यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे तालुक्यातील अनेक योजना रखडल्या असल्याचा आरोप पदाधिका-यांनी केला आहे. सध्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यात अनेक गावांमध्ये जलसंकट निर्माण झाले आहे. बहुतांश गावांच्या पाणी योजना कोलमडल्या आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना देखील रखडली असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक