शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत काडतुसांसह परप्रांतीयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:41 IST

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्तूल, गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतीय इसमाला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून दुचाकीसह मोबाइल व ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

ठळक मुद्दे संशयिताविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्तूल, गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतीय इसमाला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून दुचाकीसह मोबाइल व ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर नियंत्रण तसेच गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह पथकाने कंबर कसली आहे. या पथकाला गुरुवारी सिन्नरजवळील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत मालाविरुद्धचे गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना खबºयामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर-शिर्डी रोडवरील बेदमुथा कंपनीसमोर काही परप्रांतीय इसम अवैधरीत्या बाळगून गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरात सापळा रचून संशयित रामबाबू हिरालाल गौतम (४५) रा. भारतगज (उतर प्रदेश) हल्ली मुसळगाव एमआयडीसी यास ताब्यात घेतले. होंडा अ‍ॅक्टिव्हा मोपेड दुचाकीच्या डिकीत एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कठ्ठा व तीन जिवंत काडतुसे मिळून आले. सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही शस्रपरवाना मिळून आला नाही. संशयिताकडून ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर संशयिताविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, रवींद्र वानखेडे, प्रकाश चव्हाणके, प्रदीप राठोड पथकात सहभागी होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या पंधरवड्यात अवैधरीत्या अग्निशस्र बाळगणारे एकूण सात आरोपींविरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई करून पाच देशी बनावटीचे पिस्तूल व एक गावठी कट्टा, पंधरा जिवंत काडतुसे, सहा मॅगझिनसह गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारसायकल व एक स्विफ्ट कार हस्तगत केली आहे.