शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

क्रांतिदिनी अहिंसक मार्गानेच चक्का जाम; बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:44 IST

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले ९ आॅगस्टचे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. क्रांतिदिनी राज्यभरात होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनात कोणती अनपेक्षित घटना घडून नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी (दि.३) सिद्ध पिंपरी येथील सिद्धी गणेश मंदिराच्या आवारात मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिद्ध पिंपरी पंचक्रोशीतील मराठा समाजाच्या नागरिकांसह संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेऊन मराठा आंदोलनाविषयी भूमिका स्पष्ट केली.

ठळक मुद्देसिद्ध पिंपरी : आंदोलनाच्या आचारसंहितेवर चर्चा

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले ९ आॅगस्टचे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. क्रांतिदिनी राज्यभरात होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनात कोणती अनपेक्षित घटना घडून नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी (दि.३) सिद्ध पिंपरी येथील सिद्धी गणेश मंदिराच्या आवारात मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिद्ध पिंपरी पंचक्रोशीतील मराठा समाजाच्या नागरिकांसह संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेऊन मराठा आंदोलनाविषयी भूमिका स्पष्ट केली.सिद्ध पिंपरी येथील तालुकास्तरीय बैठकीत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, गणेश कदम, उमेश शिंदे, यांनी चक्का जाम आंदोलनाची आचारसंहिता समाजबांधवांना सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत शांततेच्याच मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. या आंदोलनाच्या काळात मराठा समाज पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करेल. त्याचप्रमाणे प्रशासनानेही सहकार्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, माजी जिल्हा परिषद भाऊसाहेब ढिकले, माजी सभापती अनिल ढिकले, उत्तम राजोळे, शंकर ढिकले आदी तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पाडण्याचे आवाहन करताना बैठकीतील उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी मराठा क्रांती मोर्चातील महिला प्रतिनिधी अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, मनोरमा पाटील, मंगला शिंदे, रोहिणी दळवी आदींसह वैभव दळवी, सुरेश ढिकले, अंबादास ढिकले, पंडित जाधव, गणेश ढिकले, शशी ढिकले, भास्कर पवार,आदित्य पाटील, सतीश पवार, विनोद भ्रमणे, रामनाथ ढिकले उपस्थित होते. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देऊन हुतात्मा झालेल्या समाजबांधवांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पोेलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनचक्का जाम आंदोलनास ९ आॅगस्टला सकाळी १० वाजता सुरुवात होणार असून, हे आंदोलन सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात आंदोलनात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी समाजबांधवांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मराठा समाजाने आरक्षणासाठी ऐतिहासिक चक्का जाम करण्याचा निर्धार केला असून, आंदोलकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशा सूचनाही आंदोलकांना करण्यात आल्या.

टॅग्स :agitationआंदोलनMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा