शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीच्या प्रदूषणाची याचिका पुनरुज्जीवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:49 IST

दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या याचिकेचे न्यायालयाने पुनरुज्जीवन करून घेतले असून यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.१) सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या राज्य शासनाने नद्यांच्या नियमन करणाऱ्या झोनचा आदेश मोडीत काढल्याने त्याबाबत न्यायालयाने विचारणा केली असून, त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांच्या विषयाला महत्त्व देणारा मुद्दा हाताळला जाणार आहे.

नाशिक : दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या याचिकेचे न्यायालयाने पुनरुज्जीवन करून घेतले असून यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.१) सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या राज्य शासनाने नद्यांच्या नियमन करणाऱ्या झोनचा आदेश मोडीत काढल्याने त्याबाबत न्यायालयाने विचारणा केली असून, त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांच्या विषयाला महत्त्व देणारा मुद्दा हाताळला जाणार आहे.२०१२ मध्ये गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत राजेश पंडित यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने वेळोवेळी अनेक आदेश निर्गमित केले असून, त्यामुळे काही प्रमाणात सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या होत्या; मात्र सुरुवातीला न्यायालयात याचिका असेपर्यंत सक्रिय असणाºया शासकीय यंत्रणा ढेपाळल्या आहेत. गोदावरी नदीची अस्वच्छता चव्हाट्यावर आली आहे. पोलीस यंत्रणेला गोदा प्रदू्षित करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत, प्लेटिंगसह अन्य प्रदूषणकारी उद्योगांनी रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी उभारलेला नाही. महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण आणि अन्य अनेक कामे बाकी असून, त्या पार्श्वभूमीवर आता केवळ निकाल देण्याच्या स्तरावर असलेल्या या याचिकेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. राज्य सरकारने नदीपात्रालगत कोणते उद्योग किती अंतरावर असावे यांसह महत्त्वाच्या नदी नियमन क्षेत्राचा नियमच रद्द केल्याने उच्च न्यायालयाने त्यासंदर्भात जाब विचारला आहे. नाशिक मनपाच्या प्रलंबित पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्राबाबतदेखील न्यायालयाने माहिती विचारली आहे. दि. १ नोव्हेंबर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी दाखल याचिकेमुळे आजवर शासकीय यंत्रणा सक्रिय झाल्याने अनेक प्रकारचे फायदे झाले आहेत. पूररेषतील बांधकामे हटविण्यात आली आहेत. तसेच गोदावरी नदीवरील पुलांवर जाळ्या टाकून निर्माल्य आणि कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे.

टॅग्स :godavariगोदावरीpollutionप्रदूषण