शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओतर्फे स्कूल बसचालकांसाठी उजळणी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:04 IST

सुरक्षितता : शालेय विद्यार्थी वाहतूक विनामूल्य प्रशिक्षण

ठळक मुद्देसुरक्षितता : शालेय विद्यार्थी वाहतूक विनामूल्य प्रशिक्षण

नाशिक : शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूककरणाऱ्या वाहन चालकांसाठी ‘विद्यार्थी सुरक्षितता व अपघातविरहित वाहतूक’ याबाबत एप्रिल व मे महिन्यात उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे़ नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय व नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिल्ड्रन ट्राफिक पार्क मध्ये हे उजळणी प्रशिक्षण वर्ग होणार आहे़ शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी शासनाने स्कूल बस अधिनियम २०११ नुसार नियमावली केली आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय परिक्षेत्रात सुमारे १ हजार ८०० स्कूल बसेसला विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे परवाने देण्यात आले आहेत. सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी वाहनचालकांना नियमांची माहिती व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व नाशिक फर्स्ट संस्थेचे अनुभवी प्रशिक्षक विनामूल्य हे प्रशिक्षण देणार आहेत. एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातील सोमवारी, बुधवारी, गुरुवारी व शुक्रवारी या दिवशी सकाळी ११ ते १ व दुपारी २ ते ४ या वेळेत हे प्रशिक्षण दिले जाणार असून, सहभागी वाहनचालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील स्कूल बस, खासगी स्कूल व्हॅनचालकांना दोन तासांचे उजळणी प्रशिक्षण व समुपदेशन एप्रिल व मे महिन्यातील कोणत्याही एका दिवशी घेणे बंधनकारक आहे. यासाठी वाहनचालकांनी परवाना नूतनीकरण व वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना उजळणी प्रशिक्षण व समुपदेशन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र