शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट रोड जलवाहिनीच्या कामाची फेरतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:25 IST

स्मार्ट रोडचे काम करताना महापालिकेच्या जलवाहिन्या सदोष पद्धतीने टाकण्यात आल्या असून, त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याची किंवा गळतीची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी या प्रकरणाबाबत स्मार्ट कंपनीला अवगत केले असून, आता या सर्व जलवाहिन्यांची चाचणी करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिले आहेत.

नाशिक : स्मार्ट रोडचे काम करताना महापालिकेच्या जलवाहिन्या सदोष पद्धतीने टाकण्यात आल्या असून, त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याची किंवा गळतीची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी या प्रकरणाबाबत स्मार्ट कंपनीला अवगत केले असून, आता या सर्व जलवाहिन्यांची चाचणी करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिले आहेत.स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान सुरू केलेल्या स्मार्ट रोडच्या कामाचे विवाद थांबतच नाहीत त्यात उलट वाढ होत आहे. दीड ते दोन वर्षांपासून रखडलेल्या या स्मार्ट रोडच्या कामामुळे नागरिक त्रस्त आहेत, परंतु कामाच्या गुणवत्तेवरदेखील शंका घेतली जात आहे. जीपीओ जलकुंभाकडून या ठिकाणी जलवाहिनी त्र्यंबक नाका आणि तेथून मेहेर सिग्नलकडे जाते. परंतु जलवाहिनी टाकताना त्या सदोष पद्धतीने टाकण्यात आल्या. मुळातच त्याला एक मीटर खोली घेणे आवश्यक असताना तशी घेतली गेलेली नाही. तसेच क्रॉस कनेक्शन करताना पाण्यासंदर्भातील मॅन्युअलचे पालन झालेले नाही.नियम निकष डावलून हे काम करीत असल्याचा आक्षेप महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याचवेळी घेतला होता. जलवाहिन्यांचा दाब तपासण्यासाठी चक्क अग्निशमन बंबातील पाणी सोडण्यात आले.रायझिंग मेनवरुन जोडण्यास्मार्ट रोडमधील कामांवर अनेक आक्षेप महापालिकेने यापूर्वीच घेतले आहेत. या रस्त्याच्या खालून जलवाहिन्या टाकताना चक्क रायझिंग मेनवरून नळजोडण्या देण्यात आल्या आहेत, असेदेखील सांगितले जाते. विशेषत: मेहेर परिसरात अशाप्रकारच्या नळजोडण्या दिल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी