शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

उच्चांकी कांदादराचा केंद्रीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:52 IST

लासलगाव बाजार समितीत कांद्याने ५१०० रु पये भाव गाठल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व नाफेडचे अधिकारी यांच्याकडून कांद्याच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.

लासलगाव : लासलगाव बाजार समितीत कांद्याने ५१०० रु पये भाव गाठल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व नाफेडचे अधिकारी यांच्याकडून कांद्याच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात बुधवारी (दि. १८) एका वाहनातील नऊ क्विंटल कांदा ५१०० रु पये प्रतिक्विंटल दराने विक्र ी झाला. कांदा भावातील चढ-उतारीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात एकच खळबळ उडाल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या अधिकारी पथकाने बाजार समितीला भेट देऊन एका रात्रीतून भावात एवढी तेजी कशी आली? यापुढील काळात बाजारभावातील चढ-उतार, सद्य:स्थितीत उपलब्ध असलेला शिल्लक कांदासाठा, नवीन कांदा पीक केव्हा व कधी येणार आणि ते येईपर्यंत साठा पुरेल का तसेच नाफेडमार्फत खरेदी झालेल्या कांद्यापैकी आतापर्यंत किती कांदा शहरी भागात पाठविण्यात आला व निर्यात शुल्क ८५० प्रतिटन झाल्यानंतर झालेल्या निर्यातीची माहिती घेतली.सध्या कुठल्या राज्यातून कांद्याला अधिक मागणी आहे, याबाबतही माहिती घेण्यात आली. बैठकीस ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक अभयकुमार, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहायक संचालक पंकज कुमार, एमआयडीएचचे मुख्य सल्लागार आर. पी. गुप्ता, नाफेडचे निदेशक निखिल पठाडे, फलोत्पादन विभाग पुणेचे सहसंचालक शिरीष जमदाडे, विभागीय अधिकारी पणन मंडळाचे विभागीय अधिकारी बहादूर देशमुख, नाशिकचे उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. वाघ, तालुका कृषी अधिकारी बटू पाटील यांचा केंद्रीय पथकात समावेश होता. यावेळी बाजार समितीचे संचालक नंदकुमार डागा, शिवनाथ जाधव, सचिव नरेंद्र वाढवणे व व्यापारी नितीन जैन आदींनी पथकाचे स्वागत करून माहिती दिली.

टॅग्स :NashikनाशिकonionकांदाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती