शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महसूलवर कारवाई झाली, पोलिसांवरही होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:10 IST

पुरवठा खात्यात कामे केलेल्या तत्कालीन चार डझनांहून अधिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलीस खात्याने इगतपुरी धान्य घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने त्याची राज्यभर चर्चा होणे जसे स्वाभाविक आहे तसेच या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीपासून पोलिसांची बदलत जाणारी भूमिकाही संशयास्पद आहे. न्यायालयात कोणा अज्ञात व्यक्तीने पुरवठा खात्याच्या संबंधित कागदपत्रे सादर करावेत व न्यायालयाने सांगितल्यावरच पोलिसांचे तपासासाठी हात शिवशिवावेत ते पाहता, पोलिसांची कृती तशी सांगून सवरून केली गेली, असे म्हणावे लागेल.

नाशिक : पुरवठा खात्यात कामे केलेल्या तत्कालीन चार डझनांहून अधिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलीस खात्याने इगतपुरी धान्य घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने त्याची राज्यभर चर्चा होणे जसे स्वाभाविक आहे तसेच या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीपासून पोलिसांची बदलत जाणारी भूमिकाही संशयास्पद आहे. न्यायालयात कोणा अज्ञात व्यक्तीने पुरवठा खात्याच्या संबंधित कागदपत्रे सादर करावेत व न्यायालयाने सांगितल्यावरच पोलिसांचे तपासासाठी हात शिवशिवावेत ते पाहता, पोलिसांची कृती तशी सांगून सवरून केली गेली, असे म्हणावे लागेल. या कारवाईने रेशनच्या धान्याचा काळाबाजार करण्यास कोणी धजावणार नाही, अशा प्रकारच्या गंभीर ‘मोक्का’सारख्या गुन्ह्याचा फास संबंधितांच्या गळ्याभोवती आवळला गेला असला तरी, हा कायदा लागू करण्यासाठी आवश्यक असलेल्या किती कायदेशीर तरतुदी या गुन्ह्यात लागू पडतात व पोलिसांच्या तपासात किती दोषींविरुद्ध सबळ पुरावे हाती आहेत हे आता खटल्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या इगतपुरी धान्य घोटाळ्यात पोलिसांनी या धंद्यातील कुप्रसिद्ध घोरपडे बंधूंसह रेशनचे धान्य घेणाºया काही व्यापाºयांवर मोक्कान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन ग्रामीण पोलीस उपअधीक्षकांकडे असतानाच घोरपडे यांचा याच धंद्यातील वैरी असलेल्या व्यक्तीने सदर उप अधीक्षकांना हाताशी धरून आपला ‘मतलब’ साधून घेतला. घोरपडे याच्याभोवती कायद्याचा फास अधिकाधिक कसा आवळता येईल यासाठी त्यानेच पुरवठा खात्यातील काही गोपनीय कागदपत्रेही पोलीस यंत्रणेला पुरविले. तथापि, घोरपडे असो की आणखी कोणी, ज्यांच्याविरोधात मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना मुळात मोक्काच्या तरतुदी लागूच होत नाहीत अशा स्वरूपाचा दावा थेट उच्च न्यायालयात करण्यात आला व त्यातून काहींना न्यायालयाने अगदी अलीकडेच दिलासा देत मोक्कातून मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत. यातील काही आरोपी अद्यापही पोलीस दप्तरी फरारच असून, त्याच्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचलेले नाहीत. असे असतानाही सिन्नरहून निघालेला तांदूळ वाडीवºहे शिवारात पकडला जातो व त्याला सन २००९ ते २०१५ या सहा वर्षांच्या काळात पुरवठा खात्यात काम केलेल्या अधिकारी, कर्मचाºयांनी हातभार लावला, असा निष्कर्ष काढून जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, कारकून अशा ५८ महसूल कर्मचाºयांना या गुन्ह्यात सह आरोपी केले गेले आहे. मुळात मोक्का म्हणजे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारी टोळी असून, अशी टोळी हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्यांना किमान सहा महिने तरी जेरबंद करून ठेवण्यासाठी ‘मोक्का’ कायद्याचा वापर केला जातो, ज्यांच्याविरुद्ध ज्या गुन्ह्यात मोक्कान्वये कारवाई करण्यात आली तशा स्वरूपाचे गुन्हे या पूर्वीही त्यांच्यावर दाखल असणे गरजेचे आहे. शिवाय पाच वर्षे ते जन्मठेप अशा स्वरूपाची शिक्षा होऊ शकेल अशा प्रकारचा प्रमाद त्याच्या हातून घडलेला असणेही कायद्याने अनिवार्य केले आहे. त्यामुळे ज्या महसूल अधिकारी व कर्मचाºयांवर मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला त्यांचा पूर्वेतिहास जर गुन्हेगारी स्वरूपाचा असेल तर शासनाच्या सेवेत ते इतकी वर्षे पात्र कशी ठरली, असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, त्याच वेळी रेशनचा काळाबाजार करणाºया व वेळोेवेळी पोलिसांत गुन्हे दाखल झालेल्या घोरपडे, चौधरीसारख्या रेशन माफियांना नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्याची विनंती पुरवठा खात्याने पाच वर्षांपूर्वी करूनही पोलीस खात्याचे हात का बांधले जावेत हा प्रश्नही अनुत्तरित आहे.  मुळात आजवर जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार केल्या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एकही रेशन दुकानदार व काळाबाजार करणाºया माफियाला शिक्षा झालेली नाही.पोलिसांच्या तपासातील त्रुटी व संशयाचा फायदा घेत अनेक आरोपींनी स्वत:ची  निर्दोष मुक्तता करून घेतली आहे. त्यामुळे रेशनच्या काळाबाजारातील आरोपींना एकप्रकारे मदत केल्याच्या कारणावरून जर महसूल कर्मचारी व अधिकाºयांवर ‘मोक्का’न्वये कारवाई होत असेल तर तशाच स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासात दोष ठेवून आरोपींना खटल्यातून मोकळे सुटण्यास अप्रत्यक्ष हातभार लावणाºया तत्कालीन पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवरही ‘मोक्का’न्वये कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होणारच!

टॅग्स :Policeपोलिसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय