१५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना याचे निवेदन देण्याची तयारी पूर्ण झालेली असताना महसूल खात्यातीलच काही अधिकाऱ्यांनी यात खोडा घातल्याची बाबही अन्य अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे हे निवेदन समाजमाध्यमांवर प्रसारित करून महसूल विभागाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे.
चौकट====
काही अधिकाऱ्यांचे दुरून दर्शन
महसूल खात्यातील काही अधिकाऱ्यांचे पोलिसांशी साटेलोटे आहे. काहींच्या कुटुंबातील व्यक्तीच पोलीस खात्यात कार्यरत असताना त्यांच्याच विरोधात निवेदन देण्यात या अधिकाऱ्यांचे हात कापले असल्याने त्यांनी निवेदनाच्या वादापासून दूर राहणे पसंत केले असून, अशा महसूल अधिकाऱ्यांविषयीही नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकट====
महसूलमंत्र्यांच्या भूमिकेवरही नाराजी
पोलिसांच्या ‘भूमाफिया’ या लघुचित्रफितीत महसूल खात्याची बदनामी होत असल्याची कर्मचारी, अधिकाऱ्यांची भावना असली तरी गेल्या आठवड्यात नाशिक भेटीवर आलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र ‘महसूल अधिकारी चुकीचे काम करीत असतील तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी’ अशी पोलिसांना पूरक भूमिका घेतल्यामुळेही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.