शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाला दोन दिवसात कोट्यवधींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:42 IST

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी अनेकजण वाहन खरेदीला प्राधन्य देतात. त्यामुळे वाहनांच्या नोंदणीत प्रादेशिक परिवहन विभाला दोन दिवसात 1 कोटी 19 लाख 47 हजार 618 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व मुहुर्ताच्या दुसऱ्या दिवशीही विविध कंपन्यांच्या वाहन विक्रेत्यांनी विक्री झालेल्या वाहनांची नोंदणी करून घेतल्याने या दोन दिवसात तब्बल 617 वेगवेगळ्य़ा वाहनांची नोंदणी झाली आहे.

ठळक मुद्देपाडव्याच्या महूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदीआरटीओला वाहन नोंदणीतून 1 कोटी 19लाख रुपयांचा महसूलदोन दिवसात विविध प्रकारच्या 617 वाहनाची नोंदणी

नाशिक : गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी अनेकजण वाहन खरेदीला प्राधन्य देतात. त्यामुळे वाहनांच्या नोंदणीत प्रादेशिक परिवहन विभागाला दोन दिवसात 1 कोटी 19 लाख 47 हजार 618 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व मुहुर्ताच्या दुसऱ्या दिवशीही विविध कंपन्यांच्या वाहन विक्रेत्यांनी विक्री झालेल्या वाहनांची नोंदणी करून घेतल्याने या दोन दिवसात तब्बल 617 वेगवेगळ्य़ा वाहनांची नोंदणी झाली आहे.  गुढीपाडवा वाहनांच्या खरेदीसाठी सर्वाना लाभदायक मूहुर्त वाटत असल्याने नाशिककरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांची मोठय़ा प्रमाणात खरेदी होत असल्याने दरवर्षी गुढीपाडव्याला प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यलय सुरु ठेवून वाहनांची नोंदणी करण्यात येते. यावषीर्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात वाहनांची खरेदी झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने दोन दिवसात तब्बल 617 वाहनांची नोंदणी केली आहे. यात 9 बसेससह 41 मालवाहू वाहने, 316 मोटार सायकल व स्कूटर, 12 मोपेड, 2 मोटर कॅब, 230 मोटर कार, 25 सीसीच्या 6 मोटराईज्ड सायकल, 1 रोडरोलर अशा एकूण 617 वाहनांची नोंदणी केली. यातून प्रादेशिक परिवहन विभागाला झाली आहे. दोन दिवसात 1 कोटी 19 लाख 47 हजार 618 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.  यातील कर स्वरुपात एक कोटी 19 लाख 33हजार 216 रुपयांच्या करासह  14 हजार 402 रुपये दंडाच्या रकमेसह 1 कोटी 19 लाख 47 हजार 618 रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.  

230 चारचाकी वाहनांची नोंदणीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी व दुचाकी वाहन खरेदी करणा:या ग्राहकांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळेच दोन दिवसात तब्बव 230 चारचाकी वाहनांची नोंदणी झाली असून त्यातून एक कोटी चार लाख 49 हजार 866 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर विविध प्रकारच्या 336 दुचाकींच्या नोंदणीतून 10 लाख 17 हजार 563 रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून  9 बसेसच्या नोंदणीतून 1 लाख 78 हजार 23 रुपये,  मालवाहू वाहानाच्या नोंदणीतून  2 लाख 85 हजार 433, दोन मोटर कॅबपासून 33 हजार 165 व एक रोड रोलरच्या नोंदणीतून 5 हजार चारशे रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.    

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिक