शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: September 15, 2015 23:52 IST

खेडकर निवासी उपजिल्हाधिकारी

नाशिक : पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या करण्यात आल्या असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांची नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या बदल्यांकडे महसूल यंत्रणेचे लक्ष लागून होते. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बदल्या यंदा पाच महिने लांबणीवर पडल्याने बदलीपात्र व बदलीच्छुक हवालदिल झाले होते, तर राज्यात जवळपास तीसहून अधिक उपजिल्हाधिकारी नेमणुकीविना बसून होते. अखेर सोमवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांची धुळ्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीपदी बदली झाली, तर निवासी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) नीलेश जाधव यांची कळवणचे प्रांत अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. जाधव यांच्या जागी मुंबईहून नितीन मुंडावरे यांची बदली झाली आहे. नाशिकच्या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागांवरही नवीन नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यात धुळ्याचे प्रांत अधिकारी विठ्ठल सोनवणे, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उपजिल्हाधिकारी रमेश काळे, श्रीमती सुरेखा चव्हाण यांचा समावेश आहे. खेडकर यांच्या जागी धुळ्याच्या विशेष भूसंपादन अधिकारी श्रीमती हेमांगी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांची नाशिकला मुद्रांक उपमहानिरीक्षक या जागेवर बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा पार पडल्यानंतरच कार्यमुक्ती देण्यात याव्यात, अशा सूचनाही शासनाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. (प्रतिनिधी)