शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

‘त्या’ शाळांना निधीच प्राप्त नसल्याचे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 01:06 IST

नाशिक : शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊनही शिक्षणाधिकाऱ्यांनी चालढकल केल्याचा जाहीर तक्रार वजा आरोप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करून प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचे अधिकार कमी करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला असला तरी, प्रत्यक्षात ज्या शाळा दुरुस्तीसाठी निधी आल्याचा दावा पदाधिकारी, सदस्यांकडून करण्यात आला, त्या शाळांसाठी अद्याप एक खडकूही प्राप्त झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. सदरची घटना म्हणजे साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार असल्याचे शिक्षण वर्तुळात बोलले जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार

नाशिक : शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊनही शिक्षणाधिकाऱ्यांनी चालढकल केल्याचा जाहीर तक्रार वजा आरोप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करून प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचे अधिकार कमी करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला असला तरी, प्रत्यक्षात ज्या शाळा दुरुस्तीसाठी निधी आल्याचा दावा पदाधिकारी, सदस्यांकडून करण्यात आला, त्या शाळांसाठी अद्याप एक खडकूही प्राप्त झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. सदरची घटना म्हणजे साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार असल्याचे शिक्षण वर्तुळात बोलले जात आहे.समग्र शिक्षांतर्गत राज्य सरकारने आॅगस्ट महिन्यात नाशिकसह राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसाठी शिक्षण परिषदेने शाळा दुरुस्तीसाठी निधी वितरीत करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली व जिल्ह्णातील ३५ शाळांची दुरुस्ती व सहा शौचालये बांधकामास मंजुरी दिली. त्यासाठी दोन कोटी ४८ लाख रुपये मंजूर असल्याचे सांगितले. तीन लाखांपेक्षा कमी खर्चाची कामे करण्यासाठी निधी थेट शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्याचे, तर तीन लाखांच्यावरील रकमेच्या खर्चाची कामे राज्यस्तरावर निविदा काढूनच केली जावीत, असा दंडक घालून दिला.सदरचा निधी व शाळा दुरुस्तीला शिक्षण परिषदेने मान्यता दिली असली तरी, सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली व थेट नोव्हेंबर महिन्यात ती संपुष्टात आली. या दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यामुळे की काय जिल्हा परिषदांना शासनाने शाळा दुरुस्तीचा निधी मात्र प्राप्त करून दिला नाही. उलट ज्या कामांचे कार्यारंभ आदेश दिलेले नसतील ती रक्कम तत्काळ शासनाकडे परत पाठविण्याचे आदेशच शासनाने दिले. गेल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शासनाने निधी पाठवूनही शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी तो खर्च करण्यात हलगर्जीपणा केल्याचा कांगावा करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात सदस्य यशस्वी झाले.मात्र या संदर्भात अधिक माहिती घेतल्यावर शाळा दुरुस्तीच्या कामांना शिक्षण परिषदेने मान्यता दिलेली असली तरी, त्यासाठी निधी मात्र अद्याप उपलब्ध करून दिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जर कामांना निधीच नाही तर कामे न केल्याचा ठपका कशाच्या आधारावर ठेवला गेला? असा सवाल आहे. ठरावानंतर कार्यवाही गेल्या गुरुवारच्या (दि. १९) सर्वसाधारण सभेत शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचे अधिकार तात्पुरते काढून घेण्याचा निर्र्णय घेण्यात आला असला तरी, अद्याप या ठरावाची प्रत सर्वपदाधिकाºयांच्या स्वाक्षरीसह प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे झनकर यांनी सोमवारीही शिक्षणाधिकारी म्हणून आपले दैनंदिन काम पूर्ण केले. प्रशासनाकडून अधिकृत अधिकार काढून घेतल्याचे पत्र प्राप्त होईपर्यंत त्या कामकाज करतील, तर प्रशासनानेही ठरावाची प्रत मिळाल्यावर झनकर यांना बाजूला सारून शिक्षणाधिकाºयांचा पदभार अन्य व्यक्तीकडे देण्याची तयारी दर्शविली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिक