शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठ सहाव्या दिवशी पूर्वपदावर

By admin | Updated: August 7, 2016 22:13 IST

पूर ओसरला : पाच गावांचे पंचनामे झाले पूर्ण

कसबे सुकेणे : गेल्या मंगळवारपासून गोदावरीच्या पुराचा सामना करणारी गोदाकाठची गावे सहाव्या दिवशी पूर्वपदावर आली असून चांदोरी, मौजे सुकेणेसह पाच गावांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागातर्फे कळविण्यात आली आहे. गोदावरीच्या महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या गोदाकाठवर मंगळवार नंतर शनिवारी पुराचे संकट कायम होते, त्यामुळे गोदाकाठच्या गावात अद्यापही पुराची भीती कायम आहे. आज रविवारी सायखेडा, चांदोरी, चाटोरी, शिंगवे येथील जनजीवन पूर्वपदावर आले. चाटोरी- सायखेडा, शिंगवे- सायखेडा, चांदोरी - सायखेडा (अवजड वाहतूक वगळून) हे सर्व रस्ते खुले झाल्याने बाजारपेठेतही आज गर्दी होती; मात्र बससेवा अद्यापही ठप्पच आहे. महसूल विभागाच्या चांदोरी मंडलच्या वतीने वीस तलाठी पथकाने गेल्या तीन दिवसांत पहिल्या टप्प्यातील पूरग्रस्त भागातील घरे व दुकाने यांचे पंचनामे पूर्ण केले असून रविवारी नागापूर येथील पंचनामे सुरु होते. सध्या शेतात पुराचे पाणी असल्याने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे लवकरच करण्यात येणार येतील. या पूरहानीत १३ जनावरे दगावली असून यात घोडा, गायी, म्हशी, शेळ्या, वासरे यांचा समावेश असल्याचे मंडल अधिकारी आर. के. बागुल यांनी सांगितले.रस्त्याची दुरवस्था पिंपळगाव बसवंत : येथे अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे या रस्त्याची पूर्णत: चाळण झाली आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित प्रशासनाने रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.