येवला : तालुक्यातील चांदगाव येथे स्मृतिभ्रंश झालेली वृद्ध महिला आढळून आली. ही महिला मूळची भुसावळ येथील होती. मानसिक आजारी असल्याने घरातील कोणालाही न सांगता ही महिला निघून आली होती. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक व पोलिसांनी या महिलेची मुलांसोबत भेट घडवून आणली.चांदगाव येथे सरला भोळे ही स्मृतिभ्रंश झालेली महिला शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी आढळून आली. यावेळी या महिलेची चौकशी केल्यावर ती महिला भुसावळ येथील असल्याचे समजले, परंतु या महिलेस संपूर्ण पत्ता सांगता येत नव्हता. विश्वासात घेऊन विचारले असता तिच्याजवळ मतदान कार्ड होते. त्यावरील पत्ता आॅर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथील होता. यावरून महिलेच्या घरचा तपास लावणे सोयीस्कर झाले.नेहरू युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक मुकुंद आहिरे यांनी त्या महिलेची माहिती नेहरू युवा केंद्राचे लिपिक सुनील पंजे यांना दिली. पंजे हे मूळचे जळगावचे असून, सध्या नाशिक येथे कार्यरत आहे. त्यांनी या महिलेची माहिती सोशल मीडियाद्वारे भुसावळ येथील रणजितसिंग राजपूत यांना पाठविली. राजपूत यांनी त्या पत्त्यावरून महिलेच्या घराशी संपर्क साधून दिला.दुसऱ्या दिवशी शोध घेतला असता ही महिला कुसूर गावाच्या पुढे मिळून आली. येवला ग्रामीण पोलीस ठाण्याला याबाबत रात्रीच माहिती देण्यात आली होती. सकाळी कॉंन्स्टेबल दराडे व पारखे यांनी सदर महिलेच्या मुलांना लॉंकडाउन असल्याकारणाने पासची सुविधा उपलब्ध करून दिली. आई व मुलांची या निमित्ताने पुन्हा एकदा भेटझाली.सध्या कोरोनामुळे गावा-गावांतील रस्ते बंद केले आहे. अनोळखी व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. अशा परिस्थितीत आमच्या मदतीला आल्याचे महिलेच्या मुलांनी सांगितले. स्वयंसेवक व पोलीस यंत्रणेचे त्यांनी आभार मानले.भ्रमणध्वनीवरून शरद भोळे यांनी सांगितले की, ती आपलीच आई आहे. आई घरातून न सांगता निघून गेलेली आहे. आईची मानसिक स्थिती चांगली नसल्याने ती कोणालाही न सांगता घराबाहेर पडते. तिच्यावर उपचारही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्या महिलेला पोलिसांच्या मदतीने घरी पोहोच करायचे होते, परंतु रात्र झाल्याने ती महिला झोपी गेली. दुसºया दिवशी सकाळी लवकर उठून ती निघून गेलेली होती. ती कुसूर गावात सापडली.
स्मृतिभ्रंश झालेल्या आईची मुलाशी झाली पुन्हा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:26 IST
चांदगाव येथे स्मृतिभ्रंश झालेली वृद्ध महिला आढळून आली. ही महिला मूळची भुसावळ येथील होती. मानसिक आजारी असल्याने घरातील कोणालाही न सांगता ही महिला निघून आली होती. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक व पोलिसांनी या महिलेची मुलांसोबत भेट घडवून आणली.
स्मृतिभ्रंश झालेल्या आईची मुलाशी झाली पुन्हा भेट
ठळक मुद्देयेवला : नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, पोलिसांची मिळाली मदत