शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

रोख रकमेसह पुरस्कार घेणार परत

By admin | Updated: December 8, 2015 23:28 IST

निर्मलग्राम पुरस्कार : मुदतीत झाले नाही हगणदारीमुक्त गाव

नाशिक : गेल्या दशकभरापासून निर्मलग्राम पुरस्कार लाभलेल्या व त्या अनुषंगाने लाखो रुपयांचे पुरस्कार स्वीकारूनही, केंद्र शासनाने दिलेल्या अंतिम मुदतीत शंभर टक्के हगणदारीमुक्त गाव न केलेल्या ग्रामपंचायतींचे पुरस्कार परत घेतले जाणार असल्याचे वृत्त आहे.या निर्णयामुळे जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींकडून निर्मलग्राम पुरस्काराची रक्कम परत घेण्याबरोबरच संबंधित गावचा निर्मलग्राम पुरस्कार काढून घेण्यात येणार असल्याने या १०७ ग्रामपंचायतींच्या विद्यमान सरपंच व ग्रामसेवकांवर पुरस्कार व पुरस्काराची रक्कम परत देण्याची नामुष्की ओढवणार आहे. जिल्ह्यात २००२-०३ पासून आजपर्यंत २२७ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम हगणदारीमुक्त पुरस्कार लाभला आहे. या पुरस्कारापोटी अनुक्रमे ५, ३ व २ लाखांची रक्कमही संबंधित ग्रामपंचायतींना गावच्या विकासासाठी देण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियानाच्या एका पथकाने केलेल्या पाहणीत कागदावर जरी शंभर टक्के हगणदारीमुक्त गावे दिसत असली तरी प्रत्यक्षात ती गावे श्ांभर टक्के हगणदारीमुक्त नसल्याचे आढळले होते. त्यानुसार केंद्र सरकारने जून २०१५ मध्येच राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या ग्रामस्वच्छता अभियान कार्यालयांना लेखी सूचना देऊन निर्मलग्राम पुरस्कार मिळालेली गावे २ आॅक्टोबर २०१५ पर्यंत शंभर टक्के हगणदारीमुक्त (ओपन डिफेसेटिव्ही फ्री व्हिलेज-ओडीएफ) करावीत अन्यथा संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आलेला निर्मलग्राम पुरस्कार आणि पुरस्कारापोटी दिलेली रक्कम परत घेण्यात येईल, असे कळविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना कळवून गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिलेल्या कालावधीत २२७ पैकी केवळ १२० गावे शंभर टक्के हगणदारीमुक्त झाली. उर्वरित १०७ ग्रामपंचायतींचे निर्मलग्राम पुरस्कार व पुरस्काराची रक्कम आता परत घेण्याची कार्यवाही विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)