शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने जिल्ह्यात  द्राक्ष उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:57 IST

हवामान खात्याने   येत्या काही दिवसांत राज्यभर जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवल्याने  जिल्ह्यातील द्राक्षबागायातदार धास्तावले आहेत. सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी जीवदान ठरलेला पाऊस परतताना नुकसान करण्याच्या भीतीने जिल्ह्यातील सर्वच शेतकरी चिंतित आहे. 

ठळक मुद्देबागांना दिवसरात्र फवारणी हंगाम उशिरा घेऊनही पावसाने अखेर गाठले; खर्चात वाढ

सायखेडा : हवामान खात्याने   येत्या काही दिवसांत राज्यभर जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवल्याने  जिल्ह्यातील द्राक्षबागायातदार धास्तावले आहेत. सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी जीवदान ठरलेला पाऊस परतताना नुकसान करण्याच्या भीतीने जिल्ह्यातील सर्वच शेतकरी चिंतित आहे. गेल्या दोन वर्षात बेमोसमी आणि अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी  यंदा गोडबार छाटणी काहीशी उशिराने सुरू केली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणारा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला मात्र परतीच्या पावसाने गाठले, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. वर्षातून एकदा घेतले जाणारे द्राक्ष पिकाला मोठी गुंतवणूक करावी लागते. गेल्या चार दिवसांपासून निफाड तालुक्यात परतीचा पाऊस सुरू असल्याने शेतकरी संकटात सापटला आहे. हा पाऊस द्राक्षांना नुकसानीचा ठरत आहे. पावसामुळे घड जिरण्याची समस्या निर्माण होत आहे. काही बागा अद्याप छाटणी होऊन सुप्त अवस्थेत असल्यामुळे त्यांच्यातील घड परिपक्व नसल्याने बाहेर निघताना कमकुवत दिसत आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसला आहे. शेतकरी लाॉकडाऊनमुळे अडचणीचा सामना करत असातानाच पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे. फवारणीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वायाकाही बागा फुलोऱ्यात तर काही पोंग्यात आहे या बागांना फवारणी कशी करावी  असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह तालुक्यात हजेरी लावल्याने फवारणी केलेली औषधे वाहून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तसेच वेळही खर्च झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्याला यंदाच्या हंगामातून अपेक्षा होती, मात्र पावसाने पाणी फेरले गेले आहे. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लाॅकडाऊनमुळे आधीच शेतकरी पिचला आहे. यात परतीच्गा पावसाने नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडला आहेे.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीRainपाऊस