शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा द्राक्ष, टमाट्याला फटका ; सोयाबीन भूईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 18:52 IST

ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तर टमाटा आणि सोयाबीनच्या मळ्यांवर करपा, शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शहर परिसरातील गंगापूर, दुगाव, मखमलाबाद, दरी, मातोरी, आडगाव, पिंपळगाव खांब, फाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.  

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा खरीप पिकांना फटका सततच्या हवामान बदलाने शेतकरी हवालदिल

नाशिक :  जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तर टमाटा आणि सोयाबीनच्या मळ्यांवर करपा, शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शहर परिसरातील गंगापूर, दुगाव, मखमलाबाद, दरी, मातोरी, आडगाव, पिंपळगाव खांब, फाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.   नाशिक परिसरात कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याचा धोका वाढला आहे. फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार असल्याने द्राक्षबागायतदारांनी द्राक्षबागांची विशेष काळजी घेत डिपिंग करण्यास सुरुवात केली असून, खराब झालेला शेंडा तोडून टाकण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे गेल्या महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले असताना त्यातून सावरलेला शेतकरी अचानक झालेल्या वातावरणामुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. सध्या फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला असून, फुलोऱ्यांतील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा प्रारंभिक  अवस्थेतच जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीचा कालावधी सुरू असतानाच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाल्यामुळे नव्याने छाटणी करण्यात आलेल्या बागांनाही रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने आता फुलोऱ्यातील बागांवर शेतकºयांना डिपींगच्या साह्याने रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.