लोकमत न्युज नेटवर्कदिंडोरी : कामधंद्यासाठी उत्तर प्रदेशातून तालुक्यात दाखल झालेले सुमारे ४०० कामगार आपल्या गावी सुखरूप परतले आहेत. दिंडोरी तालुका प्रशासनाने चोख नियोजन करून २० बसेसद्वारे त्यांना नाशिकरोड रेल्वेस्टेशनपर्यंत पोहोचविले. तेथून ते रेल्वेने आपल्या गावी गेले.दिंडोरी तालुका प्रशासनाने प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी नियोजन करत तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात असलेल्या स्थलांतरित कामगारांची नोंदणी केली होती.नायब तहसीलदार सूर्यवंशी, तलाठी रोहिणी अळकुटे, सागर बोरस्ते यांनी दिंडोरी येथे नियोजन करत विविध गावांत बसेस पाठविल्या. त्यानुसार गुरु वारी मध्य प्रदेशमधील सुमारे दीडशे कामगारांना रवाना करण्यात आले, तर शनिवारी दुपारी वीस बसेसमधून उत्तर प्रदेशमधील कामगारांना रवाना करण्यात आले. यावेळी कामगारांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेबद्दल राज्य सरकारचे व अधिकाऱ्यांचे आभार मानत कोरोनाचे संकट दूर झाले की पुन्हा येणार असल्याचे सांगत निरोप घेतला.तालुक्यातील दाखल असलेल्या बिहार व पश्चिम बंगालमधील कामगारांना घरवापसीची अद्याप प्रतीक्षा आहे. त्यांच्या राज्यात कधी गाडी जाणार, याबाबत सरकारी कार्यालयात त्यांच्याकडून वारंवार विचारणा होत आहे.अनेक कामगारांनी केला घरी जाण्याचा बेत रद्ददिंडोरी तालुक्यात सुमारे सात हजार परप्रांतीय कामगार आहेत. त्यात अनेकांनी गावोगाव तहसील कार्यालयात गावी जाण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र रेल्वेने जाणारे त्यात अत्यंत कमी आहेत. काही कामगार खासगी वाहनाने गावी गेले आहेत, मात्र आता कंपन्या सुरू झाल्याने तसेच लॉकडाउन शिथिल होत विविध कामे सुरू होण्याच्या अंदाज पाहता बहुतांशी कामगारांनी गावी परतण्याचा निर्णय रद्द केला आहे. नियमित रेल्वेसेवा सुरू होईल तेव्हाच परत जाण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
दिंडोरी तालुक्यातील ४०० परप्रांतीयांचा परतीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:14 IST
दिंडोरी : कामधंद्यासाठी उत्तर प्रदेशातून तालुक्यात दाखल झालेले सुमारे ४०० कामगार आपल्या गावी सुखरूप परतले आहेत.
दिंडोरी तालुक्यातील ४०० परप्रांतीयांचा परतीचा प्रवास
ठळक मुद्दे२० बसेसद्वारे रेल्वेस्टेशनवर पोहचविले