शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

इशान्येतील शिक्षणासाठी निवृत्त शिक्षकांनीही योगदान द्यावे-जयवंत कोंडविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 19:03 IST

पूर्वांचल भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी पूर्वांचल विकास समितीकडून शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता माध्यमातून शाळा सुरू करून सुरुवात केली आहे. या उपक्रमात शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनीही सहभागी होत आपले योगदान देण्याचे आवाहन पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी केले.

ठळक मुद्देईशान्येतीलजनतेला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरजशिक्षकांसह निवृत्त शिक्षणांनीही योगदाने देण्याचे आवाहन

नाशिक : ईशान्य भारतातील पूर्वांचल भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी पूर्वांचल विकास समितीकडून शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता माध्यमातून शाळा सुरू करून सुरुवात केली आहे. या उपक्रमात शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनीही सहभागी होत आपले योगदान देण्याचे आवाहन पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी केले.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रुंग्टा हायस्कूलचे माजी शिक्षक भय्याजी काणे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.१४) जु. स. रुंग्टा विद्यालयाच्या सभागृहात ‘शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता’ विषयावर ते बोलत होते. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कलाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या जयंती सोहळात व्यासपीठावर जनकल्याण समितीचे अध्यक्ष जयवंत कुलकर्णी, सचिव अश्विनकुमार येवला उपस्थित होते. जयवंत कोंडविलकर यांनी भय्याजी काणे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी पूर्वांचलमध्ये १९७३ मध्ये जाऊन होणारा विरोध झुगारीत नागरिकांचे मन जिंकू न पूर्वांचलमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अशाप्रकारे त्यांनी १९९३पर्यंत शेकडो मुले पूर्वांचलातून महाराष्ट्रात आणून महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबामध्ये त्यांना ठेवून त्यांच्या मनामध्ये भारताबद्दल प्रेम निर्माण केले. त्याच काळात काणे यांनी पूर्वसीमा विकास प्रतिष्ठान संस्थेची स्थापना करतानाच या माध्यमातून पूर्वांचलमध्ये शाळा सुरू केल्या असून, आजही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, त्यांनी ईशान्य भारतातील आठ राज्यांतील भौगोलिक माहिती चलचित्रांच्या साह्याने उपस्थितांसमोर मांडतानाच ईशान्य भारतात सुरू असलेल्या शाळेत शिकविण्यासाठी महाराष्ट्रातून आवड असलेले शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अश्विनकुमार येवला यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले. यशश्री कचरेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकnorth eastईशान्य भारतIndiaभारत