शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तीन राज्याचा निकाल म्हणजे लोकसभेचा ट्रेलर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 18:36 IST

योगेंद्रसिंग कटार : क्षत्रिय राजपूत एकता महासंमेलन

ठळक मुद्दे ‘राजपुताने का बब्बर शेर’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांना ‘क्षत्रिय हृदय सम्राट’ ही पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

सटाणा : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकांचे निकाल हा लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. राजपूत समाजाकडे दुर्लक्ष केल्यानेच या तीन राज्यात भाजपला पराभवाची धूळ चाखावी लागली. यापुढे जो पक्ष आमच्या मागण्यांचा विचार करणार नाही, त्यांना आम्ही असाच धडा शिकवीत राहू, असा इशारा राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंग कटार यांनी दिला.बागलाण तालुका करनी सेनेतर्फेआयोजित राज्यस्तरीय क्षत्रिय राजपूत एकता महासंमेलन व ‘राजपुताने का बब्बर शेर’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांना ‘क्षत्रिय हृदय सम्राट’ ही पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला.येथील लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती धनसिंग वाघ व प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. शेषराव पाटील, राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके,उदेसिंग अण्णा पवार, राज शेखावत, डॉ. संजय सोनवणे, चेतनिसंग राजपूत, जीवनसिंग शेरपूर, डॉ. विलास बच्छाव आदि उपस्थित होते. यावेळी सुखदेवसिंग गोगामेडी यांनी सांगितले, देशभरातील राजपूत समाजाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने आज समाजाची अपरिमित हानी झाली आहे. जोपर्यंत समाज एका छताखाली येत नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणे अवघड असल्याचे सांगितले. राजपूत समाजाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी देशभरात साडेआठ टक्के असलेल्या राजपूत समाजाच्या साडेआठशे संघटना आहेत. येत्या काळात या साडेआठशे संघटनांच्या प्रमुखांना एकत्रित करत एकाच व्यासपीठावर संमेलन घेण्याची आवश्यकता असून शासनाशी लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके, डॉ. शेषराव पाटील आदींचीही भाषणे झाली. सोहळ्यास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमूख जयप्रकाश सोनवणे, सरदारिसंग जाधव, डॉ. दिकपाल गिरासे, लकी गिल, दीपक पाकळे, नीलेश पाकळे, दरबारिसंग गिरासे, सोनाली ठाकुर, सोनाक्षी सोनवणे, शालिनी पाटील,आदींसह राज्यभरातील समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक