शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

नीट परीक्षेचा निकाल जाहीर; नाशिकच्या टॉपर्समध्ये भराडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:16 IST

वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे ६ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नाशिकच्या टॉपर्समध्ये असलेल्या विश्वेश मिलिंद भराडिया याने ६६५ गुण मिळवून आॅल इंडिया रँकमध्ये ५१वे स्थान पटकावत देशभरातील शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान अधोरेखित केले आहे.

नाशिक : वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे ६ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नाशिकच्या टॉपर्समध्ये असलेल्या विश्वेश मिलिंद भराडिया याने ६६५ गुण मिळवून आॅल इंडिया रँकमध्ये ५१वे स्थान पटकावत देशभरातील शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान अधोरेखित केले आहे.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) ६ मे रोजी परीक्षा घेण्यात आलेल्या नॅशनल इलिजिबिलिटी टेस्टमध्ये (नीट) नाशिक च्या विश्वेश भराडिया याने आॅल इंडिया रँकमध्ये ५१ वे स्थान पटकावले आहे.  विश्वेश भराडिया याला पीसीबीत ७२० पैकी ६६५ गुण मिळाले असून, फिजीक्समध्ये १८० पैकी १७०,केमेस्टीत १८० पैकी १५५, तर बायोलॉजीत ३६० पैकी ३४० असे एकूण ६६५ गुण मिळाले. त्याने सर्वसाधारण गटात ४२ वी रँक प्राप्त केली आहे. विश्वेशचे वडील मिलिंद व आई वैशाली हे दोघेही डॉक्टर असून, विश्वेसने नीटमध्ये देदीप्यमान यश संपादन करून भराडिया कुटुंबाची भावी पिढीही वैद्यकीय सेवेत येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  आरवायके महाविद्यालयातील विद्यार्थी असलेल्या विश्वेशला जोशीज लर्निंग सेंटरच्या डॉ. रोहित जोशी व प्रा. श्यामकांत आचार्य यांचेही मार्गदर्शन लाभले. नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.नीटमध्ये नाशिकचे यशस्वी विद्यार्थीनाशिकमधील प्रथमेश फडके (६२५), नीरज पंडित (६१२), उदिता बजाज (६०२), पुष्टी देवी (५८१), त्रिंबकेश लिंगधाली (५७९), यश अग्रवाल (६७३), यशराज खरडे (५५६), निसर्ग धामने (५५५), ध्यानी व्यास (५५४), गुंजन गुजराथी (५५३), भुपाली कमलास्कर (५४५), ध्रुव तिवारी (५४४), राकेश अय्यर (५४२), मंजूषा क्षीरसागर (५४०), साहिल संगोराम (५३९), प्रेरणा पंजवानी (५३८), विनीत पाटील (५३६), प्रतीक गिरासे (५३२), अदित पाटील (५१६), रेणू जोशी (५०७), तेजस बनकर (५०३), श्रेया चितोडे (५००) यांसह शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी ४०० हून अधिक गुण मिळवून नीटमध्ये यश संपादन केले असून, यातील बहुतांश विद्यार्थी एमबीबीएससह बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

टॅग्स :NEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८