शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

व्यक्तिनिष्ठता फळाला

By admin | Updated: February 25, 2017 00:30 IST

सिन्नर : माणिकराव कोकाटे यांना धक्का

शैलेश कर्पे : सिन्नरव्यक्तिनिष्ठ राजकारणाची ओळख बनलेल्या सिन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही मतदारांनी आमदार राजाभाऊ वाजे किंवा माजी आमदार माणिकराव कोकाटे या दोघांपैकी एकाच्याच पारड्यात मते टाकली. त्यामुळे शिवसेना व भाजपा वगळता अन्य पक्षांना खातेही खोलता आले नाही. नगरपालिकेपाठोपाठ सिन्नर पंचायत समितीतही शिवसेनेने एकहाती सत्ता मिळविल्याने भाजपाचे नेते व माजी आमदार माणिकराव कोकाटेंना तो धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी दमदार कामगिरी करतांना सिन्नर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेच्या ७ गटांपैकी ६ गटांवर शिवसेनेचे सदस्य विजयी केल्याने सदर निवडणूक त्यांचे नाशिक जिल्ह्णात राजकीय वजन वाढविणारी ठरली आहे.  गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्यावेळी राजाभाऊ वाजे राष्ट्रवादीत होते. तर माजी आमदार माणिकरव कोकाटे कॉँग्रेसमध्ये होते. त्यावेळी सिन्नर तालुक्यात कोकाटे यांच्या नेतृत्त्वाखाली कॉँग्रेसने ६ पैकी ४ गट जिंकले होते. तर राष्ट्रवादीला केवळ २ गट मिळवता आले होते. गेल्या पाच वर्षाच्या राजकारणात मोठा बदल झाला. वाजे शिवसेनेचे आमदार झाले तर कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीचा एकही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य विजयी होवू शकला नाही. खरी लढत वाजे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना व कोकाटे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा यांच्यातच रंगली. यात शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली. भावनेच्या लाटेवर आमदार झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांना वाजे यांनी आपल्या कामगिरीतून तडेतोड उत्तर दिल्याचे मानले जात आहे.  गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्यावेळी सिन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत कोकाटे यांना सहा तर विरोधी वाजे यांना समसमान सहा जागा मिळाल्या होत्या. मात्र कोकाटे यांनी ऐनवेळी विरोधी पक्षाचा एक सदस्य गळाला लावून पाच वर्षे पंचायत समितीवर सत्ता राखली होती. यावेळी मात्र मतदारांनी आमदार वाजे यांच्या नेतृत्त्वाखाली पंचायत समितीवर आठ जागा विजयी करुन एकहाती सत्ता दिली आहे. पालिका निवडणुकीत शहरातील मतदारांना आमदार वाजे यांच्या बाजूने कौल देत पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला होता. त्यानंतर ग्रामीण मतदारांनीही वाजे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत तालुक्यातील ६ पैकी ५ गट शिवसेनेला बहाल केले आहेत.  पूर्व भागात बोलकिल्ला म्हणून ओळखला जाणारा देवपूर गट माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना राखला. या गटात कोकाटे यांच्या कन्या कु. सिमंतिनी कोकाटे यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. आमदार वाजे यांनी कोकाटे यांच्या ताब्यातील मुसळगाव, नांदूरशिंगोटे व ठाणगाव गट खेचून आणण्यात यश मिळवले. कोकाटे यांच्या ताब्यातील तीन गट गेले आहेत. मात्र तालुक्यात शिवसेना व भाजपा उमेदवारांना मिळालेल्या आकडेवारीची बेरीज केल्यास फारसा फरक नसल्याचेही दिसते. बंडखोरीचे ग्रहणसिन्नर तालुक्याचा पूर्व भाग कोकाटे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अपेक्षेप्रमाणे कोकाटे यांनी देवपूर गट व त्यातील भरतूपर व देवपूर गणात मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. मात्र नांदूरशिंगोटे गटात गटबाजीचा फटका बसला. पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ यांनी बंडखोरी करीत राष्ट्रवादीकडून उमेवारी केल्याने भाजपाच्या मतांची विभागणी झाली. त्याचबरोबर पांगरी गणात पंचायत समितीच्या सभापती सौ. संगिता काटे यांचे पती विजय काटे यांनी अपक्ष उमेदवारी केली. या गणातून भाजपाचे रवींद्र पगार विजयी झाले. मात्र गेल्या दहा वर्षापासून ताब्यात असलेला नांदूरशिंगोटे हा गट कोकाटे यांच्या ताब्यातून गेला.