शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणी अवघ्या दोन महिन्यांत निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:25 IST

जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यांत अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून, यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़ बेलदारवाडी, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे़ ७ जानेवारी २०१८ रोजी दिंडोरीरोड परिसरात नळाचे पाणी भरीत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसून आरोपी चव्हाण याने विनयभंग केल्याची घटना घडली होती़

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यांत अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून, यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़ बेलदारवाडी, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे़ ७ जानेवारी २०१८ रोजी दिंडोरीरोड परिसरात नळाचे पाणी भरीत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसून आरोपी चव्हाण याने विनयभंग केल्याची घटना घडली होती़  ७ जानेवारी २०१८ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अकरा वर्षीय मुलगी घरात नळाचे पाणी भरीत होती़ मुलगी एकटीच असल्याची संधी साधून ४२ वर्षीय आरोपी राजू चव्हाण हा बळजबरीने घरात घुसला़ तिला उचलून घेत तिचा विनयभंग केला व पळून गेला़अवघ्या २० दिवसांत निकाल७ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या अल्पवयीन मुलगी विनयभंग गुन्ह्यात ८ जानेवारीला म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक सी़ एस़ पाटील यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत ९ एप्रिल २०१८ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ तर ११ जूनला न्यायालयात या खटल्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या २० दिवसांत हा खटला चालवून समोर आलेल्या पुराव्यांवरून दोषी ठरवित आरोपीस शिक्षा सुनावली़

टॅग्स :Nashikनाशिक