शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:07 IST

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे

नाशिक : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे; परंतु हे पेपर तपासणीचे काम सुरू असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कामांची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील, असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियांच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे.निवडणुकीच्या कामात शिक्षक-प्राध्यापकांना गुंतविल्यामुळे निकाल उशिरा लागण्याची शक्यता व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रक्रियेत व्यस्त असलेले जिल्ह्यातील तीन हजार प्राध्यापक-शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी निवडणूक आयोग राज्य सरकारला निवेदन देणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यापूर्वी शिक्षकांनी केलेल्या असहकार आंदोलनामुळे उत्तरपत्रिका तपासणी, मूल्यमापनाच्या कामास यंदा आठ दिवस उशिराने सुरुवात झाली आहे. एकीकडे बारावीच्या परीक्षा सुरू असताना निकाल वेळेवर लागावा, यासाठी तपासणी व मूल्यमापन प्रक्रियेला गती दिली जाते आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेचेही पेपर तपासण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे या कामात बहुतांश शिक्षक व्यस्त असून. उर्वरित शिक्षकांवर दहावी-बारावीच्या परीक्षा संपताच अकरावीच्या परीक्षा व प्रवेशप्रक्रियेचे काम लागणार आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणूक कामांमध्ये प्राध्यापक, शिक्षक अडकले तर मूल्यमापन प्रक्रियेवर परिणाम होऊन निकाल जाहीर होण्यास विलंब होईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण मंडळासह निवडणूक प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील शिक्षकांवरील जबाबदारीविषयी प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिक्षकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे यंदा बारावीचे पेपर तपासणीला आठ दिवस उशिराने सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास तीन हजार शिक्षक पेपर तपासणीचे काम करीत आहे. बारावीची पेपर तपासणी सुरू असतानाच अकरावीची परीक्षा घेऊन त्यांचाही निकाल जाहीर करावा लागणार आहे, तर दहावीची परीक्षा संपताच अकरावीची प्रवेशप्रक्रियाही सुरू होते. अशावेळी शिक्षकांना मतदानप्रक्रियेचे काम दिल्यास बारावीची पेपर तपासणी आणि निकालावर परिणाम होऊन निकाल लांबू शकतात.  - प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस,  राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

टॅग्स :ElectionनिवडणूकTeacherशिक्षक