शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पथकाच्या पाहुणचारावर प्रतिबंध

By admin | Updated: January 28, 2017 23:09 IST

स्वच्छ सर्वेक्षण : केंद्र सरकारचे मनपाला निर्देश

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छ शहरांच्या यादीत झळकविण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागणारे केंद्रीय पथक लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकल्यानंतर केंद्र सरकारने आता महापालिकांना पत्र पाठवून पथकाच्या पाहुणचारावर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे, दोन दिवस नाशकात आलेल्या पथकाला तीर्थाटनासह पाहुणचाराला मुकावे लागणार आहे. मात्र, या पथकावर नजर ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकाची मात्र निवास-भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत.  केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत केंद्रीय पथके ठिकठिकाणी शहरांमध्ये फिरत आहेत. यंदा देशभरातील ५०० शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची स्पर्धा होत आहे. नाशिकमधील स्वच्छतेसह अन्य कामांची माहिती घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी (दि.२७) दाखल झाले. तत्पूर्वी, मागील सप्ताहातच औरंगाबाद येथे सर्वेक्षणासाठी पाहणी करण्याकरिता आलेल्या पथकाने शहराचा क्रमांक यादीत आणण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेने खळबळ उडून विरोधकांनी भाजपा सरकारच्या या स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सदर घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आणि स्पर्धेत सहभागी महापालिकांना पत्र पाठवून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाची कोणत्याही प्रकारची व्यवस्था अथवा त्यांचा पाहुणचार करू नये, असे  स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे, शुक्रवारी नाशकात दाखल झालेल्या पथकाने चहापानासाठीही महापालिकेत हजेरी लावली नाही आणि अधिकाऱ्यांनीही त्याबाबत विचारणा केली नाही. दरम्यान, या पथकावर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निरीक्षक नियुक्त केला असून, त्यांची मात्र व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत.