सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी ते टाकेद-भंडारदरावाडी मार्गे भगूर बस व नाशिक ते टाकेद मार्गे खडकेद बस व वासाळी मुक्कामी बस सेवा चालू करणे बाबतचे निवेदन सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत परिसरातील जेष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यावतीने सोमवारी इगतपुरी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ इगतपुरीचे आगार प्रमुख संदीप पाटील यांना नुकतेच देण्यात आले.यावेळी सरपंच ताराबाई बांबळे, राम शिंदे, किसन कातोरे, कृष्णा कंचार, रतन बांबळे आदींसह प्रवासी, वाहनधारक उपस्थित होते.ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक प्रवासी ग्रामस्थ यांना सुरक्षित जाण्या-येण्यासाठी आज बस सेवा चालू होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात बस सेवा चालू नसल्याने ग्रामीण भागात दैनंदिन वृत्तपत्र, पत्रव्यवहार, टपाल सेवा, शासकीय दस्तऐवज आदी सेवांची सातत्याने गैरसोय होत आहे. एस एम बी टी येथील दवाखाण्यात भरपुर कामगार कामाला आहे. परंतू जाण्यायेण्यासाठी बस नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी नाशिक वासाळी मुक्कामी व दुपारी नाशिक आगाराची बस सेवा सुरु करावीटाकेद परिसरातील बस सुविधा वाचून वंचित असलेल्या प्रवासी जेष्ठ नागरिक यांची परिस्थिती लक्षात घेता मी वाहतूक नियंत्रक कक्ष नाशिक वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून टाकेद परिसरात नियमीतपणे बस सेवा लवकरच चालू करण्यात येईल असे आश्वासन आगार प्रमुख संदीप पाटील यांनी यावेळी दिले.जिल्हा स्तरावरील वाहतूक नियंत्रक कक्ष वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून सविस्तर चर्चा करून इगतपुरी-टाकेद-भं-वाडी मार्गे भगूर व नाशिक ते भगूर-धामणगाव-टाकेद मार्गे खडकेद बस सेवा लवकरच प्रवाश्यांच्या सेवेसाठी चालू करण्यात येईल.- संदीप पाटील, आगार प्रमुख, इगतपुरी.
टाकेद परिसरात बससेवा पूर्ववत चालू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 19:01 IST
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी ते टाकेद-भंडारदरावाडी मार्गे भगूर बस व नाशिक ते टाकेद मार्गे खडकेद बस व वासाळी मुक्कामी बस सेवा चालू करणे बाबतचे निवेदन सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत परिसरातील जेष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यावतीने सोमवारी इगतपुरी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ इगतपुरीचे आगार प्रमुख संदीप पाटील यांना नुकतेच देण्यात आले.
टाकेद परिसरात बससेवा पूर्ववत चालू करा
ठळक मुद्देटाकेद : ग्रामपंचायतकडून आगार प्रमुखांना निवेदन