शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासार्हता राखणे न्यायसंस्थेची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:32 IST

भूषण गवई : नवनियुक्त न्यायमूर्तींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन नाशिक : देशातील प्रत्येक नागरिकाचा भारतीय न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे़ या विश्वासास पात्र ठरण्याची जबाबदारी न्यायसंस्थेची आहे़ तसेच न्यायापासून शेवटचा घटकही वंचित राहणार नाही, प्रत्येकास न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य न्यायाधीश व वकिलांचे आहे, असे मार्गदर्शन उच्च न्यायायलाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात केले़

भूषण गवई : नवनियुक्त न्यायमूर्तींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : देशातील प्रत्येक नागरिकाचा भारतीय न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे़ या विश्वासास पात्र ठरण्याची जबाबदारी न्यायसंस्थेची आहे़ तसेच न्यायापासून शेवटचा घटकही वंचित राहणार नाही, प्रत्येकास न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य न्यायाधीश व वकिलांचे आहे, असे मार्गदर्शन उच्च न्यायायलाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात केले़नाशिक जिल्हा वकील संघासह तालुका वकील संघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या नवनियुक्त न्यायमूर्तींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते़ गवई पुढे म्हणाले की, समाजातील अगदी शेवटच्या घटकासही न्याय मिळाला पाहिजे़ वकील व न्यायाधीश या दोहोंनी न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे़ नाशिक जिल्हा न्यायालयात गृह विभागाच्या ताब्यातील अडीच एकर जागा मिळाली असून, या जागेवर बांधकाम करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन गवई यांनी दिले, तर न्यायमूर्ती मोरे यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली लावण्यासाठी, तसेच जलद न्याय देण्यासाठी न्यायाधीश व वकील या दोघांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले़हिंदू वारसा कायद्याबाबत विचारमंथनप्रथम चर्चासत्र महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा पुण्यातील ज्येष्ठ वकील सुधाकर आव्हाड यांनी हिंदू वारसा कायद्यातील कलम चार, कलम सहा, कलम आठ, कलम १९ व कलम तीस यासंदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निवाड्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले़ वडिलोपार्जित संपत्तीतील वारसांबाबतच्या संकल्पनेस सर्वोच न्यायालयाने उत्तम सिंगविरुद्ध सुभाग सिंग या खटल्या दिलेल्या निर्णयामुळे तडा गेला़ वारसांना कोणत्या परिस्थितीत कसे अधिकार प्राप्त होतात याबाबत सविस्तर माहिती आव्हाड यांनी दिली, तर पॅनलमधील अ‍ॅड़जालिंदर ताडगे, अ‍ॅड़ बी़ के़चौरे, अ‍ॅड़अण्णासाहेब भोसले यांनी विविध प्रश्न उपस्थित केले़