सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत व नाशिक जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित उद्योग आधार नोंदणी अभियानास उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंगळवारी पहिल्याच दिवशी ११० उद्योग घटकांची नोंदणी करण्यात आली.स्टाईसच्या येथील उद्योगभवन कार्यालयात नाशिक विभागाचे उद्योग सह संचालक बी. एस. जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्योग आधार नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला. केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार प्रत्येक सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना शासकीय कामकाजाच्या दृष्टीने उद्योग आधार नोंदणी आवश्यक असल्याचे नामकर्ण आवारे यांनी यावेळी सांगितले. उद्योग घटकांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण होईपर्यंत सदर अभियान सुरु राहणार असल्याचे ते म्हणाले. स्टाईसच्या उद्योजक सभासदांसह सिन्नर तालुक्यातील उद्योजक व व्यावसायिकांनीही उद्योगभवनमध्ये येऊन उद्योग आधार नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.याप्रसंगी स्टाईसचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष पंडीत लोंढे, संचालक संदीप आवारे, प्रभाकर बडगुजर, किशोर देशमुख, अविनाश तांबे, सुनील कुंदे, जगदीश सारडा, बाबासाहेब दळवी, आशिष जाजू, आदर्श जाजू, नितीन पाटील, नाशिक जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रावसाहेब दंडगव्हाळ, निरीक्षक एम. शेख, स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष चव्हाणके यांनी आभार मानले. (वार्ताहर)
उद्योग आधार नोंदणीस प्रतिसाद
By admin | Updated: December 8, 2015 23:35 IST