येवला : शहरातील मेनरोड येथील महालक्ष्मी मंदिरात आयोजित कोविड लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात ४४० नागरिकांनी लसीकरण करून घेतले. शिबिर प्रारंभप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, डॉ. हनुमंत पळवे यांनी मार्गदर्शन केले. संयोजक राहुल गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, अरुण काळे, मनीष काबरा, कुणाल दराडे, राजेंद्र लोणारी, महेश काबरा, आदी उपस्थित होते.
शिबिर यशस्वीतेसाठी संजीव पाटोदकर, अशोक गुजराथी, राजेंद्र पाटोदकर, अमित टोणपे, गणेश गुजराथी, नरेंद्र गुजराथी, मुकेश पटेल, सुनील गुजराथी, मुकेश पाटोदकर, अपूर्व गुजराथी, स्वप्निल गुजराथी, चिन्मय गुजराथी, तन्मय गुजराथी, रूपेश गुजराथी, मनोज गुजराथी, मनीष गुजराथी, सचिन गुजराथी, रितेश पाटोदकर, सूरज पाटोदकर, आदींनी परिश्रम घेतले.
(१८ येवला लस)