शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महोत्सवास नाशिककरांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:37 IST

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रदर्शनस्थळी थाटलेल्या कृषी साहित्य, गृहोपयोगी वस्तूंना मागणी असल्याचे दिसून आले.

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रदर्शनस्थळी थाटलेल्या कृषी साहित्य, गृहोपयोगी वस्तूंना मागणी असल्याचे दिसून आले.आबासाहेब मोरे, विभागीय धर्मादाय आयुक्त प्रदीप घुले, राजेश खिंवसरा, भास्कर बेहरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास प्रारंभ झाला. इलेक्ट्रिक रिक्षा, बाइक आदी वाहाने, अ‍ॅग्री ड्रोन कॅमेरा, ३०० पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पती, सोलर उत्पादने, शिंपी, सोनार, लोहार यांच्याकडे मिळणारी अवजारे, वस्तू लक्ष वेधत आहे. कृषी पर्यटन, जोड व्यवसाय, शासनाच्या शेतकºयांसाठी योजना, बारा बलुतेदार, कृषी क्षेत्रातील पारंपरिक अवजारे यांचे दर्शन घडवणारे गावाचे जिवंत मॉडेल, दुर्गसंवर्धनासाठी प्रबोधनपर देखावा, पारंपरिक खेळ, क्रीडा व कौशल्य मांडणी (१४ विद्या, ६४ कला आदी), कुस्ती आखाडा, बैठे खेळ, मोय, बैलगाडी, नांगर, औत, ट्रॅक्टर, गावचा बाजार, जत्रा, मंदिरे, पारंपरिक सण, उत्सव, आदर्श गोशाळा, पशुपालन, आदर्श विवाह सोहळा आदींचे देखावे साकारण्यात आले आहे. याशिवाय कृषी संस्कृती दर्शन, पशुधन व गोवंश प्रदर्शन, देशी बी-बियाणे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. दुर्मिळ व औषधी वनस्पती, त्यांचे काढे, औषध, गोळ्या यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी दिसून येत आहे. दुपारी ‘देशी बी-बियाणे काळाची गरज’ हे चर्चासत्र रंगले. या चर्चासत्रात देशी बियाणांचे महत्त्व, त्यांचे जतन करण्याच्या पद्धती, त्यांची उपयुक्तता, त्याचे उत्पादन, होणारा फायदा, घ्यावयाची काळजी आदी पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. सायंकाळी कृषी सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. प्रदर्शनासाठी मोफत प्रवेश असून, रविवारपर्यंत ते चालणार आहे.विक्रमी संख्येचा वधूवर मेळावामहोत्सवाअंतर्गत आयोजित वधूवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विवाहेच्छुक वधूवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर, जिल्हा व राज्यस्तरातून जवळपास २५०० इच्छुक यात सहभागी झाले होते. सेवामार्गाअंतर्गत विवाह नोंदणीत उपलब्ध असलेली व प्रदर्शनस्थळी नव्याने झालेल्या स्थळांच्या नोंदणीची माहिती यावेळी सर्व उपस्थितांना देण्यात आली. या मेळाव्याच्या माध्यमातून भविष्यकाळात जे विवाह जमणार आहेत ते गुरूपीठावर सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. च्नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकºयांच्या मुला-मुलींचे विवाह धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या व सेवाभावी धार्मिक संस्थांच्या मदतीने होणार आहे. या उपक्रमासाठी सेवामार्ग व कृषी महोत्सवाच्या वतीने ५१००० रपयांचा धनादेश धर्मादाय आयुक्त प्रदीप घुले यांना आबासाहेब मोरे यांच्या हस्ते देण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरी