नाशिक : मारुतीच्या तीनही डिलर्सकडून समर सेव्हिंग्ज मेगा एक्स्चेंज कार्निव्हलचे डोंगरे वसतिगृह मैदानात पहिले ग्राहक डॉ. जे. आर. एखंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मारुतीचे एरिया मॅनेजर कुंतल बॅनर्जी, टेरीटरी सेल्स मॅनेजर देवेंद्र आहेर, टेरीटरी ट्रू व्हल्यू मॅनेजर नितीन शर्मा, ऑटोमोटिव्हचे नित्यानंद नायक, शान कार्सचे अमोल गोसावी, सेवाचे दुर्गेश हटकर आदि उपस्थित होते. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून अनेकांनी १ ग्रॅम गोल्ड कॉईनसह आपली नवीन मारुती खरेदी केली. याच पार्श्वभूमीवर मारुतीच्या तीनही डिलर्सकडून पुन्हा एकदा कार्निव्हलदरम्यान कार खरेदी करणार्या ग्राहकांसाठी गोल्ड कॉइन अथवा तीन हजार अपघाताचे एम.जी.ए. मोफत देण्याची सुविधा दिली आहे. कार्निव्हलमध्ये ८५ हजार रुपयांपर्यंत भरघोस बचतीचा फायदा थेट ग्राहकांना मिळत असून, जुन्या कार्सची सवार्ेत्तम किंमत अशा प्रकारच्या ग्राहकाभिमुख योजनांमुळे समर सेव्हिंग्ज मेगा एक्स्चेंज कार्निव्हल सध्या नाशिककरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. फोटो : समर सेव्हिंग्ज मेगा एक्स्चेंज कार्निव्हलचे डोंगरे वसतिगृह मैदानवर डॉ. जे.आर. एखंडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मारुतीचे कुंतल बॅनर्जी, देवेंद्र आहेर, नितीन शर्मा, नित्यानंद नायक, अमोल गोसावी, दुर्गेश हटकर आदि.
मारुती सुझुकीच्या एक्स्चेंज कार्निव्हलला प्रतिसाद
By admin | Updated: May 10, 2014 23:46 IST