शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कळवणला कष्टकºयांच्या सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:29 IST

कळवण : जय भवानी, जय शिवाजी घोषणांचा जयजयकार, झेंड्यांनी कळवण शहरासह तालुक्यातील गाव, खेडे, पाड्यावरील संपूर्ण परिसरात निर्माण झालेले शिवमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देशिवजन्मोत्सव : भगवती प्रतिष्ठानचा उपक्रम; तालुक्यात शिवजयंती उत्साहात

कळवण : जय भवानी, जय शिवाजी घोषणांचा जयजयकार, झेंड्यांनी कळवण शहरासह तालुक्यातील गाव, खेडे, पाड्यावरील संपूर्ण परिसरात निर्माण झालेले शिवमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळ्यांची सजावट, लेजीम व टिपरी पथकासह ढोलताशांचा गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहर व तालुक्यात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गावागावातून शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली.कळवण, अभोणा, मानूर, पाळे, शिरसमणी, ओतूर, कनाशी भागात शिवभक्तांनी मोटारसायकल रॅली काढली. मोटारसायकलवर लावलेले भगवेध्वज लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र कळवण शहर व तालुक्यात यानिमित्ताने दिसून आले. कळवण येथील भगवती प्रतिष्ठानतर्फे बसस्थानक परीसरात आरास तयार करण्यात आली होती. शिवजन्मोत्सवानिमित्ताने भगवती प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील अठरापगड जातीतील कष्टकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भगवती प्रतिष्ठानच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहरातील विविध भागात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किशोर पगार यांनी सूत्रसंचालन केले.सायंकाळी ५ वाजता शहरातून निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश पगार, शिवसेना शहरप्रमुख साहेबराव पगार व शहरातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. मेनरोड मार्गे निघालेल्या मिरवणुकीच्या स्वागताला शिवभक्तांनी दुतर्फा गर्दी केली होती. विविध मंडळांनी मिरवणुकीचे स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. कळवण येथील भगवती प्रतिष्ठानने शहरात अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. भगवती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अठरापगड जातीतील कष्टकºयांचा सन्मान केला. सन्मानाची संकल्पना साकारत उपेक्षित घटकांचा सन्मान केला.