शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीच्या सदस्याबाबत आयुक्त करणार निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:56 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यत्वासाठी निवड सभा घ्यावी किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती; मात्र त्यांनी गोंधळात टाकणारे उत्तर दिले असल्याने गुरुवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडून निराकरण करून घेतले जाणार असून, त्यानंतरही संभ्रम असल्यास जिल्हा प्रशासनाकडून निराकरण करून घेतले जाणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यत्वासाठी निवड सभा घ्यावी किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती; मात्र त्यांनी गोंधळात टाकणारे उत्तर दिले असल्याने गुरुवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडून निराकरण करून घेतले जाणार असून, त्यानंतरही संभ्रम असल्यास जिल्हा प्रशासनाकडून निराकरण करून घेतले जाणार आहे.महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपाची एक रिक्त जागा भरण्यासाठी सध्या हालचाली सुरू असून, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता असल्याने नगरसचिवांनी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती; मात्र निवडणूक आचारसंहितेच्या कलम २७ नुसार कार्यवाही असे पत्र देऊन जिल्हा प्रशासनाने नियमाचा अर्थ लावून योग्य तो निर्णय घेण्याचे काम महापालिकेकडेच सोपवून दिले. त्यामुळे नगरसचिव विभाग बुचकळ्यात पडला आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे हे रजा संपवून गुरुवारी (दि.२८) महापालिकेत रुजू होणार असून, आता त्यांच्याकडूनच याबाबत निराकरण करून घेऊन कार्यवाही केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.गमे यांच्याकडून निराकरण न झाल्यास जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून नेमके काय करायचे, हे समजावून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. अगोदर पत्राचा योग्य अर्थ न लागल्याने बुधवारीच (दि. २७) नगरसचिव जिल्हा प्रशासनाकडे धाव घेऊन काय करावे, याचे मार्गदर्शन घेणार होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त