शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमालाच्या युवकांकडून ग्रामविकासासाठी संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 14:32 IST

घोटी : ग्रामपंचायत निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पडतो. निवडून आल्यानंतर मात्र दिलेल्या शब्दांचे पालन कोणी करीत नाही. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी शब्दाला जागण्यासाठी थेट रायगड किल्ल्यावर युवकांचे विचार जागवले. शिवरायांना वंदन करून ग्रामविकास करण्याचा संकल्प केला.

घोटी : ग्रामपंचायत निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पडतो. निवडून आल्यानंतर मात्र दिलेल्या शब्दांचे पालन कोणी करीत नाही. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी शब्दाला जागण्यासाठी थेट रायगड किल्ल्यावर युवकांचे विचार जागवले. शिवरायांना वंदन करून ग्रामविकास करण्याचा संकल्प केला.नुकत्याच पार पडलेल्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच गणपत जाधव यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनेलने घवघवीत यश मिळवले. थेट सरपंच म्हणून शरद उर्फ दादू सोनवणे विजयी झाले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून गणपत जाधव, शोभा नाठे, सीताबाई नाठे, कृष्णा सोनवणे, परशराम नाठे, दीपिका नाठे, लिलाबाई नाठे हे विजयी झाले. विकास पॅनेलने गोंदे दुमाला गावात भरघोस विकास करण्यासाठी जनतेचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे. त्यानुसार गावातील १२० तरूणांसह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी रायगड किल्ला सर केला. शिवरायांच्या विचारांचा जागर करून ग्रामविकास करण्याचा संकल्प तरूणांनी केला. या कार्यक्र मासाठी सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या गडकिल्ले मोहिमेतून सहकार्य मिळाले.यावेळी हिरामण नाठे, अनिल सातपुते, विनोद जाधव, विनोद नाठे, अजय नाठे, सुनील नाठे, अमोल टर्ले, सुनील आहेर, बाळासाहेब सोनवणे, निलेश सोनवणे, राहुल खातळे, सागर नाठे, माधव नाठे, रवी नाठे, शिवराम जाधव, नितीन जाधव, नितीन सातपुते, शहाजी नाठे, शंकर नाठे, भाऊसाहेब बोडके, बाळासाहेब मेंगाळ, अमोल खरोटे, गणपत नाठे आदी युवक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक