शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कालबद्ध पदोन्नतीचा ठराव विखंडित

By admin | Updated: May 7, 2017 01:12 IST

महासभेने सन २०१४ मध्ये केलेला ठराव शासनाच्या नगरविकास विभागाने विखंडित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेतील सुरक्षा विभागात १२ वर्षांहून अधिक सेवा झालेल्या सुरक्षा रक्षकांना शैक्षणिक अर्हता नसतानाही कालबद्ध पदोन्नती देण्याचा महासभेने सन २०१४ मध्ये केलेला ठराव शासनाच्या नगरविकास विभागाने विखंडित केला असून, कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक अर्हतेत शिथिलता देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जानेवारी २०१४ मध्ये झालेल्या महासभेत सुरक्षा विभागात गेल्या २० ते २५ वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १२ वर्षे पूर्ण होऊनदेखील प्रशासनाकडून वेळोवेळी शैक्षणिक पात्रता नसल्याचे कारण पुढे करून त्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यापासून डावलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. शासन नियमानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना १२ वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यांना पदोन्नती मिळाली नसेल तर त्यांची कुंठितता घालविण्यासाठी कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू करण्यात येते. यापूर्वी, ३० मे २०११ रोजी झालेल्या महासभेत काही कर्मचाऱ्यांना त्यांचा प्रदीर्घ सेवाकाळ लक्षात घेता, त्यांची कुंठितता घालविण्यासाठी सुधारित वेतनश्रेणी देण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्याचाच आधार घेत महासभेने सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांविषयीचा ठराव मंजूर केला होता. परंतु, सदरचा ठराव नियमबाह्य असल्याने आयुक्तांनी तो शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठविला होता. त्यानुसार, शासनाने शैक्षणिक अर्हतेत शिथिलता देऊन योजनेचा लाभ देण्याची तरतूद नसल्याचे कारण दर्शवत सदरचा ठराव हा महापालिकेच्या आर्थिक हिताविरुद्ध असल्याने विखंडित केला आहे.