नाशिक : पदव्युत्तर शिक्षणासाठी आरोग्य सेवेत असतानाच वर्षभरासाठी रजेवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसह परागंदा असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तातडीने भरण्यात यावीत, असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला. शिक्षण व आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांच्या उपस्थितीत आरोग्य समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत सदस्य डॉ. भारती पवार यांनी आगामी सिंहस्थात जिल्'ात लाखो भाविक येणार असल्याने आरोग्य सेवेवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरू करावी. डझनावर वैद्यकीय अधिकारी परागंदा व पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी गेलेले असल्याने प्रत्यक्षात ते सेवेत असल्याचे दिसत असूनही ती पदे रिक्त आहेत. ही सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने केली पाहिजे. त्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करावा, असा ठराव डॉ.भारती पवार यांनी मांडला त्यास मनीषा बोडके यांनी अनुमोदन दिले. तसेच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या महामार्गावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज यंत्रणा व साहित्य असावे, अशी मागणीही डॉ.भारती पवार यांनी केली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरा आरोग्य समितीच्या बैठकीत ठराव
By admin | Updated: March 25, 2015 01:03 IST