सिन्नर : तालुक्यातील सोनांबे शिवारातील आई भवानी मंदिर व डोंगर परिसरात वनप्रस्थ फाउंडेशन व तुफान आलंया ग्रुपच्या वतीने आई भवानी डोंगरावर चौथ्या वर्षीचे वृक्षारोपण सोनांबे गावाच्या सरपंच पुष्पाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विक्रमी तीन तासात एक हजार रोपांची लागवड करण्यात आलीसोनांबे शिवारातील आई भवानी मंदिर व डोंगर परिसरात गत तीन वर्षापासून वनप्रस्थ फाउंडेशन सहकारी वृक्षप्रेमी व जलमित्र यांच्या सहाय्याने अभिजीत देशमुख, सुनील विशे, उमेश देशमुख , सोपान बोडके हे या वृक्षांचे संवर्धन करीत आहेत. मंदिराचे विश्वस्थ बाजीराव बोडके यांनी आपल्या कूपनलिके द्वारे वृक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली आहे . यापूर्वी येथे तीन वर्षात सुमारे १८०० वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात आले आहे. आजवर लागवड व संवर्धन केलेल्या वृक्षांची एकूण संख्या ही सुमारे ३००० इतकी पूर्ण करण्याचा कार्यकर्त्यांचा मानस आहे. या वर्षी वृक्ष लागवडी साठी सलग समपातळी चर खोदण्यात आले असून या चरांच्या कडेला वृक्षारोपण करून वृक्षारोपणासोबतच जल संवर्धन देखील साध्य होणार आहे. दरम्यान, वृक्षारोपन प्रसंगी दत्तात्रेय पवार, बाजीराव बोडके, योगेश करंजकर, डॉ. योगिता ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.एकाच दिवसात सर्व रोपांची लागवड करण्यासाठी वनप्रस्थ फाउंडेशन व तुफान आलंया ग्रुपचे दत्ता बोराडे, राजाभाऊ क्षत्रिय, डॉ. महावीर खिवंसरा, अभिजीत देशमुख, अनिल जाधव, सोपान बोडके, सौरव आंबेकर, गौरव आंबेकर, नाना माळी, संदीप आहेर, सचिन आडणे, मिसाळ सर, सचिन कासार, दीपक भंडारी, सत्यजित कळवणकर, सुमेर सिंग, हर्शल आणेराव, शाम गवळी, संदीप इंगळे हे गेल्या सुमारे एक महिन्यापासून रोज सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत श्रमदान करीत होते.
भवानी डोंगरावर हिरवाईचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:00 IST
हजार रोपांची लागवड : ‘वनप्रस्थ’व 'तुफान आलयं'चा उपक्रम
भवानी डोंगरावर हिरवाईचा संकल्प
ठळक मुद्दे वृक्षांची एकूण संख्या ही सुमारे ३००० इतकी पूर्ण करण्याचा कार्यकर्त्यांचा मानस