शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सामुदायिक विवाह सोहळ्यांना उत्तेजन देण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:04 IST

आदिवासी वारली समाजातील बांधवांनी यापुढे सामुदायिक विवाह सोहळ्यांना उत्तेजन देऊन अवाजवी खर्चाला फाटा द्यावा, तसेच लग्न सोहळ्यातील मानपान बंद करून त्याऐवजी वधू-वरांच्या पित्यांना कर्जमुक्तीसाठी आर्थिक मदत करून समाजापुढे आदर्श ठेवावा, असा ठराव आदिवासी वारली समाजाच्या वधू-वर सुचक मेळाव्यात सर्वानुमते घेण्यात आला.

पंचवटी : आदिवासी वारली समाजातील बांधवांनी यापुढे सामुदायिक विवाह सोहळ्यांना उत्तेजन देऊन अवाजवी खर्चाला फाटा द्यावा, तसेच लग्न सोहळ्यातील मानपान बंद करून त्याऐवजी वधू-वरांच्या पित्यांना कर्जमुक्तीसाठी आर्थिक मदत करून समाजापुढे आदर्श ठेवावा, असा ठराव आदिवासी वारली समाजाच्या वधू-वर सुचक मेळाव्यात सर्वानुमते घेण्यात आला. वारली समाजाचा वधू-वर मेळावा रविवारी (दि.२८) तपोवनातील भारत सेवाश्रम संघ येथे संस्थापक अध्यक्ष नवनाथ हुमन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ पागी, किशोर मानभाव, योगेश रिंजड, सुनील मानभाव, कृष्णा भडांगे, भारत थाळकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात वारली समाजाचा पहिलाच वधू-वर मेळावा झाला. यावेळी उपवधू-वरांनी स्वत:चा परिचय करून दिला. यावेळी झालेल्या मेळाव्यात सर्व समाज बांधवांनी यापुढे आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, पदवीधर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे कल वाढवावा, शासकीय नोकरीत असणाऱ्या समाजातील प्रत्येक बांधवाने एक विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घ्यावा, वारली शिक्षण फंडाची स्थापना करणे, तसेच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्याला उद्भवणा-या अडीअडचणी सोडविण्यासाठी समाजाच्या माध्यमातून प्रयत्न करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन विवाह सोहळ्यात होणाºया अवाजवी खर्चाला फाटा देत सामुदायिक विवाहांना उत्तेजन देण्याचा ठराव यावेळी सर्वानुमते करण्यात येऊन नाशिकमध्ये  वारली भवन उभारण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.मोफत क्लासवारली समाजाच्या बांधवाने हिरावाडी परिसरात समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेले आहे. या मार्गदर्शन व क्लासेसमध्ये येणाºया समाजातील विद्यार्थ्यांना लोकसेवा व राज्यसेवा परीक्षांबाबत मार्गदर्शन करून क्लासेस मोफत घेतले जातात त्यासाठी समाजातील बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक