शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:47 IST

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.

सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.शालेय पोषण आहाराचा मुद्दा गेल्या बैठकीत चर्चिला जावूनही या बैठकीत तो विषयपत्रिकेत आला नाही, यावरुन भाजपाचे पंचायत समिती सदस्य तातू जगताप यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत जगताप यांनी बैठकीत जमीनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.पंचायत समितीची मासिक बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सभापती भगवान पथवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी उपसभापती जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, शिवसेना गटनेते संग्राम कातकाडे, भाजपा गटनेते विजय गडाख, सदस्य सुमन बर्डे, वेणुबाई डावरे, रविंद्र पगार, तातु जगताप, संगीता पावसे, राहिणी कांगणे, शोभा बर्के, योगिता कांदळकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सबंधीत अधिकाºयांनी मनमानी करत हा विषय त्यातून वगळल्याने भाजपा सद्स्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. शालेय पोषण आहार हा विषय किरकोळ नसून जिव्हाळ्याचा आणि अत्यंत गरजेचा असल्याचे सदस्य रवींद्र पगार यांनी सांगितले. त्यावर शिवसेनेचे गटनेते कातकाडे यांनी मध्यस्थी करत नजरचुकीने विषय राहिला असेल तर अधिकाºयांनी आपली चूक मान्य करावी तसेच सदर विषयावर सभागृहात चर्चा करावी असे सांगितल्याने भाजप सदस्यांचे समाधान झाले.पाणीपुरवठ्याच्या विषयावर चर्चा करतांना बारागावपिंप्रीसह ७ गाव पाणीपुरवठा योजनेत ठेकेदाराच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून सबंधीत अधिकाºयांनी लक्ष घालावे अशी सूचना उपसभापती भाबड यांनी मांडली. वावीसह ११ गावे योजनेत देखील लक्ष घाला असे सदस्य पगार यांनी सांगीतले. सभेला विविध विभागांचे अधिकारी गैरहजर राहतात. आपला तालुका जिल्हा परिषद अध्यक्षांचा तालुका आहे. आपल्याच तालुक्यात अधिकारी अशाप्रकारे मनमानी करत असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे मत गटनेते विजय गडाख यांनी मांडले.बैठकीत वनविभाग, कृषी विभाग, एसटी महामंडळ, विजवितरण विभाग, आरोग्य यासह विविध विभागांच्या योजना आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी