शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरच्या क्रीडांगण स्थलांतरास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:20 IST

उपनगर येथे प्रस्तावित असलेले क्रीडांगण आमदार देवयानी फरांदे यांनी अचानक दीपालीनगर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिकरोड : उपनगर येथे प्रस्तावित असलेले क्रीडांगण आमदार देवयानी फरांदे यांनी अचानक दीपालीनगर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सदरचा निर्णय भेदभाव करण्यासाठी घेतल्याचा आरोप करीत हे काम याचठिकाणी व्हावे, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी (दि.२१) आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले. दरम्यान, देवयानी फरांदे यांनी उपनगर परिसरातील काही नागरिकांनी क्रीडांगणाऐवजी सामाजिक सभागृहाची मागणी केल्याने हा प्रस्ताव अन्यत्र स्थलांतरित करण्याचा केवळ प्रस्ताव आहे. अजून तो संमत झालेला नाही असे सांगितले.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाची उपनगर प्रभाग १७ मधील क्रीडांगण विकसित करण्याची मान्यता बदलून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग २३ दीपालीनगर येथील मोकळी जागा क्रीडांगण म्हणून विकसित करण्याचा घाट घातल्याचा आरोप यासंदर्भात नागरिकांनी केला आहे. नगरसेवक प्रशांत दिवे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्तांना निवेदन दिले. यात या ठिकाणी क्रीडांगण व्हावे यासाठी पंचवीस ते तीस वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून, आता शासनाने क्रीडांगण मंजूर होऊन कामास सुरुवात होत असताना हे काम दीपालीनगर येथे स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. सदरचे काम याच ठिकाणी कायद्याच्या चौकटीत बसवून व्हावे, अशी मागणी मोहन पवार, रोशन आढाव, अनिल देठे, संजय लोखंडे, पंकज कर्पे, सचिन भोसले यांच्यासह अन्य नागरिकांनी दिले आहे.उपनगर येथे क्रीडांगण व्हावे यासाठी मीच महापालिका निवडणुकीच्याही आधी पाठपुरावा केला होता. परंतु या भागातील काही नागरिकांनी क्रीडांगण नको त्याऐवजी सामाजिक सभागृह हवे असा आग्रह धरल्याने क्रीडांगण दीपालीनगर येथे करण्याचा प्रस्ताव दिला. त्याचप्रमाणे त्या नागरिकांच्या मागणीनुसार सामाजिक सभागृह तसेच याच भागात साडेचार कोटी रुपयांचे उद्यानदेखील साकरण्याचा प्रस्ताव आहे. क्रीडांगण विकासाच्या प्रस्तावाचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र यासंदर्भात उपनगर येथील नागरिकांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल.  - आमदार देवयानी फरांदे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDevyani Farandeदेवयानी फरांदे