लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : मनमाड पालिकेच्या नवीन नगरपालिका इमारतीसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नियोजित दारू दुकानासाठी परवानगी देण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन आययूडीपीमधील महिला व नागरिकांनी प्रभारी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांना दिले. परिसरात शाळा, अभ्यासिका, वाचनालय, मंदिरे असल्याने येथे महिला-मुलांचा राबता असतो. दारू दुकान सुरू झाल्यास त्याचे विपरित परिणाम होतील, अशी नागरिकांची तक्रार आहे. शांततेचा भंग होऊन या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. नियोजित दारू दुकानास परवानगी देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
नियोजित दारू दुकानास विरोध
By admin | Updated: July 1, 2017 00:48 IST