शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पद्मावतला विरोध : नाशिकच्या गंगापूर धरणावरील करणी सेनेचे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 16:25 IST

‘नही चलेगी, नही चलेगी पद्मावत नही चलेगी’, ‘भन्साळी मुर्दाबाद’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी गंगापूर धरणाकडे धाव घेतली.

ठळक मुद्दे गंगापूर धरणावर कार्यकर्त्यांना घेतले ताब्यातभन्साळी यांना समर्थन देणा-या भाजपासह मनसेचाही निषेध

नाशिक : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी करणी सेना व हिंदुत्ववादी संघटनांकडून नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात करण्यात आलेले जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळून टाकले. ‘नही चलेगी, नही चलेगी पद्मावत नही चलेगी’, ‘भन्साळी मुर्दाबाद’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी गंगापूर धरणाकडे धाव घेतली; परंतु अगोदरच प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कार्यकर्त्यांना धरणाच्या प्रवेशद्वारावरच ताब्यात घेतले.तत्पूर्वी आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या देत संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला यापुढेही असाच विरोध सुरू ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट केले. राजपूत करणी सेनेचे  महासचिव आनंदसिंग ठोके यांनी म्हटले की, जीवंतपणी पद्मावतीमातेचा असा अपमान होताना आम्ही बघू शकत नाही, त्यामुळे प्रशासनाने आम्हाला जलसमाधी घेण्याची परवानगी द्यावी. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यासर्व प्रकाराविषयी गंभीर नसल्याने याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये त्यांना भोगावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भन्साळी यांना समर्थन देणा-या भाजपासह मनसेचाही निषेध केला. तसेच राजपूत समाजातील जे लोक विविध राजकीय पक्षांमध्ये पदाधिकारी आहेत, त्यांनी लगेचच त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असा सूरही यावेळी व्यक्त करण्यात आला.दरम्यान, तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढताना कुठल्याही प्रकारचे अनुचित कृत्य करू नये, अशी विनंती केली. यावेळी महाराणा प्रताप क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, महाराणा प्रताप युवा सेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष किशोर पवार, प्रसिद्धिप्रमुख करणसिंग देवरे, प्रदेश सचिव जितेंद्र सूर्यवंशी, नाना मोरखड, सचिन पवार, लखन पवार, सुरेखा राजपूत, वंदना राजपूत आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Padmavatपद्मावतDeepika Padukoneदीपिका पादुकोणKarni Senaकरणी सेना