शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणाचे पाणी मुकणेत टाकण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:10 IST

इगतपुरी तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी संपूर्ण आरक्षित असलेल्या वैतरणा धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मुकणे धरणात वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी विचाराधीन असलेल्या या प्रश्नावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी घेतलेल्या निर्णयास इगतपुरी तालुक्यातील विशेषत: वैतरणा धरणामुळे धरणग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी संपूर्ण आरक्षित असलेल्या वैतरणा धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मुकणे धरणात वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी विचाराधीन असलेल्या या प्रश्नावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी घेतलेल्या निर्णयास इगतपुरी तालुक्यातील विशेषत: वैतरणा धरणामुळे धरणग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जोपर्यंत राज्य शासन आमच्या अधिगृहित केलेल्या जमिनी मूळ मालकांना परत करीत नाही तोपर्यंत आम्ही वैतरणाचे पाणी मुकणेत टाकू देणार नाही, याबाबतचे निवेदन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.गेल्या अनेक वर्षांपासून वैतरणा धरणासाठी संपादित केलेल्या हजारो हेक्टर जमिनीपैकी सद्यस्थित संपादित असून, परंतु शेतकरी कसत असलेल्या आणि वैतरणा धरण भरले तरी पाण्यात न जाणाºया शेकडो एकर जमिनी शासनाने मूळ मालकांना परत करावयाच्या अटीवर संपादित केलेल्या आहेत. या जमिनी संबंधित शेतकरी कसत असले तरी उतारा शासनाच्या नावाचा आहे. गेल्या अवकाळी पावसात नुकसान होऊनही हे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले.मुकणे धरणातून नाशिक महानगरपालिकेला पाणी जाणार असल्याने येथील भूमिहीन शेतकºयांच्या वारसांना महापालिकेत नोकरी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या मागण्या जोपर्यंत महाराष्ट्र शासन पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आमचा शासनाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतलेल्या निर्णयास लोकप्रतिनिधी या नात्याने न्याय मिळेपर्यंत तीव्र विरोध राहील.- हिरामण खोसकर, आमदार

टॅग्स :Waterपाणी