शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बॅँकेने निर्बंध हटविल्याने नामकोला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 15:52 IST

प्रशासकाच्या एककल्ली कारभारामुळे मार्च २०१६ मध्ये बँकेचा ढोबळ एनपीए १२ टक्के, मार्च २०१७ मध्ये २४ टक्के व मार्च २०१८ मध्ये २९ टक्के झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१६ ते २०१९ पर्यंत वारंवार अनेक निर्बंध जारी केले

ठळक मुद्दे१५ टक्के लाभांक्ष वाटणार : चार वर्षांपूर्वी लादले बंधने

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यात दोन लाखाहून अधिक सभासद असलेल्या उत्तरा महाराष्टÑातील सर्वात मोठ्या नागरी सहकारी बॅँक असलेल्या नाशिक मर्चंट बॅँकेवरील रिझर्व बॅँकेने लादलेले निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. निव्वळ एनपीए सहा टक्क्यांच्या आत आणल्यामुळे प्रशासक काळात चार वर्षांपूर्वी लादलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे हटविले आहेत. त्यामुळे आता सभासदांना १५ टक्के लाभांश वाटण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी गुरूवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक मर्चंट््स को-आॅपरेटिव्ह बँकेच्या सातपूर येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले की, सन २०१४ पूर्वी संचालक मंडळाच्या कार्यकाळात बँकेचा ढोबळ एनपीए ४ टक्के व निव्वळ एनपीए शून्य टक्के होता. जानेवारी २०१४ नंतर प्रशासकाच्या एककल्ली कारभारामुळे मार्च २०१६ मध्ये बँकेचा ढोबळ एनपीए १२ टक्के, मार्च २०१७ मध्ये २४ टक्के व मार्च २०१८ मध्ये २९ टक्के झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१६ ते २०१९ पर्यंत वारंवार अनेक निर्बंध जारी केले होते. त्यामुळे सभासदांना लाभांश देणे, नवीन शाखा उघडणे, बांधकाम व्यावसायिकांना पतपुरवठा करणे अशा अनेक बाबींवर बंधने घालण्यात आली होती. त्यानंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन ५ जानेवारी २०१९ पासून संचालक मंडळाच्या हाती कारभार आल्यानंतर व्यवस्थित नियोजन करून जानेवारी २०२० अखेर बँकेचा ढोबळ एनपीए १० टक्क्यांच्या आत आणि निव्वळ एनपीए ६ टक्क्यांच्या आत आणल्याने रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात ६ जानेवारीला पत्र पाठवून बँकेवरील सर्व निर्बंध हटवून बँकेला बंधनातून मुक्त केले आहे. निर्बंध हटविण्यात आल्यामुळे सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. लाभांश पोटी ७ कोटी ५२ लाख रुपयांचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संचालक मंडळासह सभासदांना मोठा दिलासा मिळाल्याचेही भंडारी म्हणाले. यावेळी हेमंत धात्रक, विजय साने, शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, शिवदास डागा, सुभाष नहार, अशोक सोनजे, प्रशांत दिवे, रंजन ठाकरे, महेंद्र बुरड, प्रकाश दायमा, संतोष धाडीवाल, गणेश गिते, कांतीलाल जैन, हरीश लोढा, प्रफुल्ल संचेती, नरेंद्र पवार आदी संचालक उपस्थित होते. 

टॅग्स :bankबँकNashikनाशिक